अमरावती : महानगरपालिकेच्या सूतगिरणी प्रभागातील मतमोजणी दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने मतमोजणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. या प्रभागात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये तीव्र टशन निर्माण झाले असून फेर मतमोजणीची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
नवसारी येथील डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडा संकुलात सुरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मतमोजणीतील आकडे व प्रक्रियेवर आक्षेप घेत दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करत मतमोजणी थांबवली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी स्थळी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
या घटनेमुळे सूतगिरणी प्रभागाचा निकाल रखडला असून राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शहरातील इतर प्रभागांचे निकाल जाहीर होत असतानाच या प्रभागातील तणावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Tension halted vote counting in Amravati's Sutgirni ward due to clashes between Shinde and Thackeray factions. Recount demands and verbal disputes escalated, prompting police intervention and delaying results. The situation remains tense as officials monitor the area.
Web Summary : अमरावती के सूतगिरनी वार्ड में शिंदे और ठाकरे गुटों के बीच झड़प के कारण मतगणना रुकी। पुनर्गणना की मांगों और मौखिक विवादों के बढ़ने से पुलिस को हस्तक्षेप करना पड़ा और परिणाम में देरी हुई। अधिकारी क्षेत्र पर नजर रख रहे हैं।