शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Amravati Election Results 2026 : अमरावतीत भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुबड्यांची गरज; युवा स्वाभिमान पक्ष येणार का मदतीला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:54 IST

Amravati : अमरावती महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांमध्ये बराच खल झाला. दरम्यान, चर्चा, मंथन आणि बैठकांचा रतीब पार चालला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांमध्ये बराच खल झाला. दरम्यान, चर्चा, मंथन आणि बैठकांचा रतीब पार चालला. मात्र, 'एकला चलो'चा नारा देत सर्वच पक्षांनी रिंगणात उमेदवार उभे केले. तथापि, शुक्रवारी निकाल हाती आल्यानंतर सत्तापक्ष भाजपने २५ जागांवर विजय मिळवला असला तरी गतवेळीपेक्षा २० जागांवर पीछेहाट झाली आहे. आता भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुबड्यांची गरज लागणार असून, मित्र पक्ष असलेल्या युवा स्वाभिमानला सोबत घ्यावे लागणार आहे.

यंदा निवडणुकीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान आणि एमआयएमने जोरदार मुसंडी मारली आहे; परंतु राष्ट्रवादी (शरद पवार) ला खातेदेखील उघडता आले नाही. प्रचारादरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप '५५ प्लस'चा नारा दिला होता; पण निकाल काही वेगळाच लागला आहे. 

काँग्रेसने प्रचारात कोणताही बडेजाव न करता मतदारांवर फोकस केला होता. काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळवला आहे. माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत हे दोन्ही दिग्गज विजयी झाले असून, त्यांच्या प्रभागात 'सब कुछ' काँग्रेस असा निकाल लागला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) ने थेट ८५ जागांवर उमेदवार उभे केले होते; पण ११ जागांवर विजय मिळाला. गत निवडणुकीत तीन जागांवर विजय मिळवणाऱ्या युवा स्वाभिमानने यंदा १५ जागांवर विजय खेचून आणला आहे. आमदार रवी राणांची जादू चालली, हे निकालाने स्पष्ट झाले. १२० अपक्ष उमेदवार रिंगणात असले तरी एकालाही विजय मिळवता आला नाही. 

मात्र, काही अपक्षांनी घेतलेल्या मतांमुळे अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, व अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या जाहीर सभासुद्धा फार करिष्मा करू शकल्या नाहीत, हे विशेष. उद्धवसेना, बसप आणि शिंदेसेनेला अपेक्षेप्रमाणे यश मिळविता आले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Election: BJP needs support; Yuva Swabhiman Party to help?

Web Summary : BJP won Amravati elections but fell short of a majority. Yuva Swabhiman's support is crucial for forming the government. Congress and NCP also gained seats while MIM made inroads. Senior leaders rallies failed to create enough impact.
टॅग्स :Amravati Municipal Corporation Electionअमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६AmravatiअमरावतीMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६