शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरातील पूर्व मेळघाट वनविभाग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 17:58 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्प एकछत्री नियंत्रणांतर्गंत चिखलदरा व्याघ्र प्रकल्पाच्या नियंत्रणाखाली आला आहे. यात तेथील वन उद्यानासह वनविश्रामगृह आणि परतवाडा-चिखलदरा रोडवरील धामणगाव गढी येथील तपासणी नाकाही व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. यामुळे चिखलदरा येथे येणा-या पर्यटकांसह इतरांना व्याघ्र प्रकल्पाचे नियमांना सामोरे जावे लागणार आहे.

अनिल कडूपरतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प एकछत्री नियंत्रणांतर्गंत चिखलदरा व्याघ्र प्रकल्पाच्या नियंत्रणाखाली आला आहे. यात तेथील वन उद्यानासह वनविश्रामगृह आणि परतवाडा-चिखलदरा रोडवरील धामणगाव गढी येथील तपासणी नाकाही व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. यामुळे चिखलदरा येथे येणा-या पर्यटकांसह इतरांना व्याघ्र प्रकल्पाचे नियमांना सामोरे जावे लागणार आहे. चिखलदरा येथील पूर्व मेळघाट वनविभाग बंद करण्यात आला आहे. या कार्यालयाच्या इमारतींसह उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षकांचे निवासस्थान व्याघ्र प्रकल्पाचे ताब्यात देण्यात आले आहे. तसे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर यांनी १५ जानेवारीला निर्गमित केले आहेत. यात आता सर्व ब्रिटीशकालिन इमारती व्याघ्र प्रकल्पाचे अधिपत्याखाली आल्या आहेत. या इमारतींमध्ये परतवाडा येथील गुगामल वन्यजीव विभाग आपला संसार थाटणार आहे. गुगामलमध्ये कार्यरत सहाय्यक वनसंरक्षक, कार्यालयीन कर्मचारी, कार्यालयीन साहित्य व संपूर्ण दस्ताऐवज सोबत घेवून चिखलदरा येथे सात दिवसाचे आत स्थलांतरित होण्याचे आदेश अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालकांचे कार्यालयाने गुगामल वन्यजीव विभागाला १७ जानेवारीला दिले आहेत.

एकछत्री नियंत्रणांतर्गंत पूर्व मेळघाट वनविभाग आणि पश्चिम मेळघाट वनविभाग बंद करून त्या ऐवजी मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग अस्तित्वात आणण्यात आला आहे. या नव्या कार्यालयाचे कामकाज परतवाडा येथील पश्चिम मेळघाट वनविभागाच्या कार्यालयातून पार पाडल्या जाणार आहे. तर नव्याने अस्तित्वात आलेल्या मेळघाट वन्यजीव विभागाचे कामकाज परतवाडा येथील गुगामलच्या इमारतीतून चालणार आहे. मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वनअधिकारी नॉन आयएफएस दर्जाचे राहणार आहेत. या सर्व घडामोडीत पूर्व मेळघाट वनविभागाच्या उपवनसंरक्षक पियुषा जगताप यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपवनसंरक्षकांचे पुनर्वसनपियुषा जगताप पूर्व मेळघाट वनविभागाला तर अविनाशकुमार पश्चिम मेळघाट वनविभागाला उपवनसंरक्षक म्हणून कार्यरत आहेत. दोघेही आयएफएस आहेत. पती-पत्नी एकत्रिकरणात त्यांनी या सोयीच्या जागा मिळविल्या होत्या. पण आता एकछत्री नियंत्रणांतर्गंत पूर्व मेळघाट वनविभाग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तर पश्चिम मेळघाट वनविभागाचे मेळघाट (प्रादेशिक) वनविभागात रूपांतर करण्यात आले आहे. यामुळे उपवनसंरक्षक पियुषा जगताप व त्यांचे पती अविनाशकुमार यांचे पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गंत मेळघाट बाहेर पुनर्वसन होण्याची शक्यता बळावली आहे. सद्या पियुषा जगताप बाळंपणाचे रजेवर आहेत. यात या दोघांच्या सोबतीला एक कन्यारत्न जन्माला आले असून या कन्येचे त्यांनी नुकतेच मन:पूर्वक स्वागतही केले आहे.

स्थानांतरण, मुख्यालय बदलप्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर यांचे १५ जानेवारीच्या आदेशान्वये प्रादेशिक वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी डि. के. मुनेश्वर, एच. पी. पडगव्हाणकर, पी. एस. आत्राम, जे. एस. सौदागर, वाय. व्ही. तपस यांचे स्थानांतरण करून त्यांचे मुख्यालयात बदल करण्यात आला आहे. मुनेश्वर यांना गाविलगड-चिखलदरा, पडगव्हाणकर यांना घटांग, आत्राम यांना जामली, सौदागर यांना खोंगडा तर तपस यांना धुळघाट येथे देण्यात आले आहे. आकोट येथील सहाय्यक वनसंरक्षक व्ही. डी. डेहनकर यांचे स्थानांतर परतवाडा येथील मेळघाट वन्यजीव विभागाला करण्यात आले आहे.

मेळघाट वन्यजीव विभाग परतवाडा येथे विभागीय वनअधिकारी म्हणून अमरावती येथील वनसंपत्ती सर्व्हेक्षण घटक व कार्य आयोजनाच्या विभागीय वनअधिका-याचे स्थानांतरण करण्यात आले आहे. पण सद्या हे पद रिक्त आहे.

टॅग्स :MelghatमेळघाटTigerवाघ