शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना, राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 09:52 IST

Amravati: आता युवकांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, असा मोलाचा सल्ला राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी दिला.

अमरावती - केंद्र सरकारचे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण है नीतीमूल्य आणि पिढी घडविणारे ठरणार आहे. येत्या काळात आधुनिक शिक्षण प्रणाली विकसित होणार आहे. त्यामुळे आता युवकांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, असा मोलाचा सल्ला राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी दिला.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर मुख्य अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे होते. पुढे राज्यपाल बैस म्हणाले, अमरावती विद्यापीठाने गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर किमान १० गावे दत्तक घेऊन समाजात परिवर्तन करावे. यापुढे कोणतेही महाविद्यालय 'नॅक' मूल्यांकन शिवाय राहता कामा नये, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन सर्वच महाविद्यालयांचे 'नॅक' करून घ्यावे, असे आवाहन राज्यपाल बैस यांनी केले.

दर्डा सुवर्ण पदकाचे सात गुणवंत ठरले मानकरीअभियांत्रिकीच्या विविध सहा शाखांतून प्रथम आणि सर्व शाखामधून गुणवत्ता प्राप्त एक अशा सात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. यात आशुतोष राठोड (यवतमाळ), प्रियंका चव्हाण (शेगाव), लखन राठी (अमरावती), प्रतीक जाधव (यवतमाळ), शाहीद शफी तवर (बडनेरा), प्राची अपाले (बडनेरा), समीक्षा ढोक (चरुड) यांना राज्यपाल रमेश बैस, कुलगुरू डॉ. प्रमोद यावले, प्र-कुलगुरु डॉ. प्रसाद वाडेगावकर यांच्या हस्ते पदकांनी गौरविण्यात आले.

सेवाग्रामला भेटराज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी सेवाग्राम आश्रमात भेट दिली. यावेळी त्यांनी आश्रमाविषयी माहिती घेतली. पूज्य बापूजीचा साधेपणा आणि स्वाभाविकता जीवन याविषयी पुस्तकात वाचले होते. आज या ठिकाणी येऊन मी वास्तविकता पाहिली आहे. गांधीजींचे देशाप्रती योगदान विसरू शकत नाही, असा अभिप्राय त्यांनी येथे नोंदविला.

टॅग्स :jobनोकरीEducationशिक्षण