शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९५.५८ टक्के; वाशिम विभागातून अव्वल, अकोला दुसऱ्या स्थानी

By गणेश वासनिक | Updated: May 27, 2024 14:36 IST

नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९३.२२ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सहाव्या स्थानी होता. यावेळी क्रमवारीत पाचव्या स्थानी सुधारणा झाली आहे.

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९५.५८ टक्के लागला आहे. नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९३.२२ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सहाव्या स्थानी होता. यावेळी क्रमवारीत पाचव्या स्थानी सुधारणा झाली आहे.

अमरावती विभागातून एकूण १ लाख ६१ हजार ४९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षेला १ लाख ५९ हजार ६८४ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी १ लाख ५२ हजार ६३१ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. अमरावती विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९५.५८ आहे. विभागात निकालाच्या टक्केवारीत वाशीम जिल्हा अव्वलस्थानी आहे.जिल्हानिहाय निकालाची टक्केवारीवाशीम: ९६.७१ टक्केअकोला ९६.४५ टक्के,बुलढाणा ९५.९५ टक्के,यवतमाळ ९५.०० टक्केअमरावती : ९४.६१ टक्केमुलींचाच वरचष्मादरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात मुलांपेक्षा सरस असल्याचे दाखवून दिले आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९७.१६ टक्के तर मुलांची ९४.१८ टक्के आहे. विभागातून ८४ हजार ८९१ मुलांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ७९ हजार ९५७ मुले, तर ७४ हजार ७९३ मुलींपैकी ७२ हजार ६७४ मुली उत्तीर्ण झाल्या.प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी सर्वाधिकअमरावती विभागात उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांपैकी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी म्हणजे ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्याविद्यार्थ्यांची संख्या ६० हजार २२५ इतकी आहे. प्रथम श्रेणी म्हणजे ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ५२ हजार ९७६, द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ३२ हजार १०२ तर काठावर ३५ टक्क्यांहून पुढे गुण मिळवणाऱ्याया विद्यार्थ्यांची संख्या ही ७ हजार ३२८ इतकी आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल