लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: दर्यापूर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. यावेळी थिलोरी येथील नवरदेव संतोष डिगांबर वाकपांजर याने बोहल्यावर चढण्यापूर्वी गावात मतदानाचा हक्क बजावला. ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता १८७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती. मतदान करण्यापूर्वी स्क्रीनिंग टेस्ट करण्यात आली. गावागावांत मतदानाचा उत्साह दिसून आला. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता १०४२ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले होते. त्यापैकी २२ उमेदवार अविरोध निवडून आले. आता १०२० उमेदवारांना मतदारांचा कौल १८ जानेवारी रोजी कळेल.
-----------