शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्याची नजर अंदाज ५३ पैसैवारी; जिल्हा प्रशासनाकडून अहवाल जाहीर

By जितेंद्र दखने | Updated: September 30, 2022 19:30 IST

शेतातील पीक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा पैसेवारी जाहीर करते.

सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना जिल्हा प्रशासनाने नजर अंदाज ५३ पैसेवारी शुक्रवारी जाहीर केली. यामध्ये केवळ सहा तालुक्यांना न्याय देण्यात आला तर उर्वरित तालुक्यात पीक आलवेल असल्याचे चित्र दिसून येते. याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. शेतातील पीक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा पैसेवारी जाहीर करते. यावरून पीक परिस्थितीचा अंदाज येतो. यासोबत रॅण्डमली पिक कापणी प्रयोग होतात. त्यावरून उत्पन्नाचा अंदाज येतो. या अंदाजानुसार केंद्र शासन शेतमालाचे आयात निर्यातीचे धोरण ठरविते. यामुळे या अहवालाला सर्वाधिक महत्त्व आहे. प्रत्यक्ष जिल्ह्याची स्थिती नाजूक असताना नजर अंदाजाच्या पैसेवारीचा प्रथम अहवाल ५३ पैसेवारीचा आला आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच जिल्ह्यातील पिक परिस्थिती कशी याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नजर अंदाज पैसेवारी जाहीर करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर अखेर पर्यतचे निरीक्षण ग्राह्य धरले जाते. महसूल विभागाची यंत्रणा याचे सर्वेक्षण करते. ही यंत्राचा सप्टेंबरला अहवाल सादर करुन तो जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूर करण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील १९९५ गावांपैकी लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या१९५९ आहे. यात १४ तालुक्यातील ५० टक्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावामध्ये ८५१ गावांचा समावेश आहे.तर ११०८ गावांची नजर अंदाज आणेवारी ही ५० टक्यापेक्षा जास्त आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ११५९ गावांची आणेवारी जाहीर केली आहेत.

यात सन २०२२-२३ ची नजर अंदाज आणेवारी ही ५३ पैसेवारी आली आहे. जिल्ह्यातील ९० महसुली मंडळाकडून महसूल विभागाचे यंत्रणेचा पहिला नजर पैसेवारीचा अहवाल आला आहे.या अहवालात काही तालुक्यातील काही गावांची स्थिती चिंताजनक आहे. मात्र काही तालुक्यातील गावांची पिक पैसेवारी ५० टक्याच्या आत तर काही तालुक्याची पैसेवारी ही ५३ पैसेवारीपर्यत आली आहे. अतिवृष्टीने संपूर्ण जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला. पिकाची वाढ खुंटली, शेत शिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात तण वाढले अशी परिस्थिती असताना नजर पैसेवारी ५० टक्क्यापेक्षा जास्त आली आल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.तालुकानिहाय ५० टक्याच्या आतील व वरील पैसेवारीसन २०२२-२३ च्या खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी मध्ये ५० टक्याच्या आता मध्ये असलेल्या तालुके व पैसेवारी यामध्ये चांदूर रेल्वे ४७,धामनगांव रेल्वे ४६,मोर्शी ४१,वरूड ४३,अचलपूर ४८,चांदूर बाजार ४६ या सहा तालुक्याची पैसेवारी ही ५० पैसेवारीच्या आत आहे.तर ५० पेक्षा जास्त आणेवारी असलेल्या तालुक्यामध्ये अमरावती ५४,भातकुली ६४,तिवसा ५५,नांदगाव खंडेश्वर ५४,दर्यापूर ६४,अंजनगाव सुजी ५७,धारणी ६२,चिखलदरा ५४ अशा आठ तालुक्याची आणेवारी ही ५३ पैसेवारी हून अधिक आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीfloodपूर