शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 23:10 IST

SGBAU: संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून ते पन्नास दिवस ही कादंबरी हटवण्यात आली आहे. 'बीए मराठी'च्या द्वितीय वर्षाला अभ्यासासाठी असलेल्या या कादंबरीबद्दल तक्रार करण्यात आली होती.  विद्वत परिषदेत २३ विरुद्ध ८ असे मतदान झाले.

-गणेश वासनिक, अमरावती अमरावती : लेखक पवन भगत लिखित 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली आहे. यासंदर्भात गुरुवार २ एप्रिल रोजी पार पडलेल्या विद्वत परिषदेत २३ विरुद्ध ८ अशांनी मतांनी ही कादंबरी हटविण्याचा निर्णय सभागृहात झाला. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या पीठासीनाखाली ‘मॅनेजमेंट’पार पडली.

अमरावती विद्यापीठाकडे डॉ. संगीता जगताप यांनी ९ डिसेंबर २०२५ रोजी 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी 'भाजप सरकारविरोधी' असल्याचा आक्षेप घेतल्याने ती हटवण्याची मागणी केली होती. 

त्याअनुषंगाने हा विषय अभ्यास मंडळाने पुन्हा निर्णयार्थ पाठविला होता. तेव्हा ही कादंबरी 'बीए मराठी'च्या द्वितीय वर्षाला अभ्यासासाठी कायम ठेवण्याचा निर्णय बोर्ड ऑफ स्टडीने घेतला होता; परंतु ही तक्रार विद्वत परिषदेपुढे गेली. 

या कादंबरीवर विद्वत परिषदेत चर्चा झाली. येथे ही कादंबरी हटविण्याचा निर्णय झाला. परिषदेत कादंबरीसंदर्भात चर्चा झाली असता सदस्यांमध्ये मतेमतांतरे आणि मनभेद दिसून आले. तेव्हा कुलगुरू डॉ. बारहाते यांनी सदस्यांचे हात उंचावून मतदान घेतले असता 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटवावी, यासाठी २३ जण विरोधात, तर ८ सदस्य बाजूने असल्याचे चित्र होते. अखेर कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या कार्यवाहीचा निर्णय ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटविण्याचा निर्णय घेतला, हे विशेष.

नेमकं काय घडलं?

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रम निर्धारित करणाऱ्या मराठी अभ्यासमंडळाने 'बीए मराठी'च्या दुसऱ्या वर्षातील चौथ्या सत्रासाठी 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी समाविष्ट केली होती. मराठी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. काशीनाथ बऱ्हाटे यांनी सहा महिन्यांपूर्वी ही कादंबरी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची प्रक्रिया झाली.

मराठी अभ्यासमंडळाने एकमताने या कादंबरीचा समावेश केला होता. विद्याशाखेत मान्य झाल्यानंतर अकॅडमिक कौन्सिलमध्येही या अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली होती. ती शिकवण्याचं कामही सुरू झाले होते, असे त्यांनी सांगितले.

लेखकांना लिहिण्याचे स्वातंत्र्य

'ते पन्नास दिवस' ही कादंबरी ललित साहित्य कृती आहे. कोरोना काळातील लिखाण असून पक्ष अथवा सरकारवर ताशेरे ओढण्याचा प्रश्नच येत नाही. लेखकांना लिहिण्याचे स्वातंत्र्य असून दोषांकडे व्यापक दृष्टिकोनातून स्वीकारार्थ असावे. लोकशाही मूल्यांचे जतन व्हावे, ही काळाची गरज आहे, असे साहित्याच्या समीक्षक डॉ. मोना चिमोटे म्हणाल्या. 

कादंबरी अभ्यासक्रमातून हटवणे ही एकप्रकारे अघोषित आणीबाणी आहे. लेखनस्वातंत्र्यावर गदा येते आणि सेन्सॉरशिप करणे उचित नाही. ही कादंबरी अभ्यासक्रमाला लावा, असा कसलाही अर्ज मी विद्यापीठांना कधीही केलेला नाही. विद्यापीठानेच हे पुस्तक स्वीकारलं होते, असे कादंबरीचे लेखक पवन भगत यांनी सांगितले. 

कुलगुरु म्हणाले...

विद्वत परिषदेत कादंबरीबाबत एकमत होत नव्हते. त्यामुळे मतदान झाले आणि बहुमताने 'ते पन्नास दिवस' कादंबरी हटविण्याचा निर्णय झाला. सभागृहाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाणार आहे. -डॉ. मिलिंद बारहाते, कुलगुरू, अमरावती विद्यापीठ.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati: Novel 'Te Pannas Divas' Removed from University Syllabus

Web Summary : Amravati University removed 'Te Pannas Divas' after objections claimed it criticized the BJP government. The decision followed a vote in the academic council. Author alleges censorship; the university defends the democratic process.
टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठliteratureसाहित्यmarathiमराठी