विकेंडला गतीमान होणार शहर बसची चाके; करारनामा अंतिम टप्प्यात 

By प्रदीप भाकरे | Published: March 13, 2023 05:40 PM2023-03-13T17:40:07+5:302023-03-13T17:41:40+5:30

५.२३ रुपये प्रतिकिलोमिटरने मिळणार रॉयल्टी

Amravati city bus services disrupted since March 1 signaled to be normalized from this weekend | विकेंडला गतीमान होणार शहर बसची चाके; करारनामा अंतिम टप्प्यात 

विकेंडला गतीमान होणार शहर बसची चाके; करारनामा अंतिम टप्प्यात 

googlenewsNext

अमरावती : गेल्या १ मार्चपासून विस्कळित झालेली शहर बस सेवा या विकेंडपासून सुरळित होण्याचे सुसंकेत आहेत. सिटी बससेवेसाठी महापालिका प्रशासनाने नवा कंत्राटदार नेमला असून, त्याच्यासोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्ष दोन महिने या कालावधीसाठी तो करारनामा असेल. महापालिकेला नवं कंत्राटदार ५.२३ रुपये प्रतिकिलोमिटरने रॉयल्टी देणार आहे.

येथील विपीन चव्हाण यांच्याशी असलेले शहर बस वाहतूक सेवेचे कंत्राट २२ फेब्रुवारी रोजीच्या आदेशान्वये रद्द करण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या १७ शहर बस जप्तदेखील करण्यात आल्या. त्याच दिवशी शहर बस उपक्रम मेघा ट्रॅव्हल्सकडे हस्तांतरित करण्यात येत असल्याचा आदेश निघाला. मात्र, चौकशीअंती मेघा ट्रॅव्हल्सला दिलेला आदेशदेखील रद्द करण्यात आला. पुढे महापालिकेच्या मालकीच्या २५ शहर बसेस हा उपक्रम राबविण्याकरिता ३ मार्च रोजी शॉर्ट टेंडर जारी करण्यात आले आहे.

त्या निविदा प्रक्रियेदरम्यान एलवन ठरलेल्या साहू टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सवर शहर बसचा नवा अभिकर्ता म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पुढील तीन वर्ष साहू टुर्स महापालिका क्षेत्रात शहर बस उपक्रम राबवतील. त्याबाबतचा प्रस्ताव कार्यशाळा विभागाकडून स्थायी समितीकडे पाठविण्यात आला असून, त्यावर शिक्कामोर्तब होताच करारनामा व कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया त्वरेने पुर्ण केली जाणार आहे. कार्यशाळा विभागाचे उपअभियंता लक्ष्मण पावडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पिचला जातोय अमरावतीकर

१ मार्चपासृून २५ पैकी सुस्थितीत असलेल्या १७ ही बसेस प्रशांतनगरच्या मोकळ्या जागेत थांबलेल्या आहेत. आता त्या १७ वा १८ मार्चपासून पुर्ववत धावतील असा अंदाज आहे. मात्र गेल्या १३ दिेवसांपासून अमरावतीकर प्रवाशांची सिटीबसऐवजी प्रचंड ससेहोलपट होत आहे. दामदुप्पट भाडे देऊनही अमरावतीकर प्रवासी सिटीबसचे फिल अनुभवू शकला नाही. लालपरीसारखी शहर बस देखील अमरावतीकरांची ‘लाईफलाईन’ बनल्याचे ते द्योतक आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्वरीत तोडगा काढून शहर बस पुर्ववत करावी, अशी सामान्य अमरावतीकरांची माफक अपेक्षा आहे.

शहर बससेवेसाठी अभिकर्ता फायनल झाला आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला आहे. करारनामा व वर्कऑर्डर हे प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर विकेंडपासून शहर बस पुर्ववत धावण्याची शक्यता आहे.

- लक्ष्मण पावडे, प्रमुख, कार्यशाळा विभाग

Web Title: Amravati city bus services disrupted since March 1 signaled to be normalized from this weekend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.