शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

Amravati: १६५२ जलस्रोतांची रासायनिक पाणी नमुने तपासणी, पाणी स्वच्छता विभागाची मोहीम

By जितेंद्र दखने | Updated: May 20, 2024 21:38 IST

Amravati: अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वे क्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६५२ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी २ मेपासून मोहीम सुरू झाली आहे. ३० मेपर्यत ही तपासणी मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे.

- जितेंद्र दखनेअमरावती - जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वे क्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६५२ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी २ मेपासून मोहीम सुरू झाली आहे. ३० मेपर्यत ही तपासणी मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत जलस्रोतांच्या गुणवत्तेनुसार लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना दिले जाणार आहे. या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात जलस्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रफुल्ल भोरखडे यांनी दिली.

सद्यस्थितीत जिल्ह्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या मान्सृूनपूर्व स्त्रोतांची सासायनिक तपासणी याद्वारे होणार आहे. यासाठी सर्व तालुक्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहीमेत जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने जलसुरक्षा रक्षक,गावातील पाच महिलांचे मार्फत व आरोग्यसेवक, आरोग्य सहायक यांच्या सहकायनि गोळा केले जात आहेत. संकलित पाणी नमुन्याची तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या उपविभागीय प्रयोगशाळेतून केली जाणार आहे. गुणवत्ताधारितजोखीम निश्चितीजिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी प्रपत्र अ, ब, क तयार करून आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरविण्यात आले असून, त्याद्वारे स्रोतांचा परिसर, योजनेमधील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीस पाणी गुणवत्तेविषयी जोखीम निश्चित केली जाणार आहे. त्याआधारे ग्रामपंचायतीस लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येणार आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे हा हेतू स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जलस्रोतांच्या पाण्यामध्ये असलेल्या कमतरतेची माहिती मिळण्यास मदत होते. त्यावर जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागामार्फत उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, हाच प्रशासनाचा मुख्य हेतू आहे. स्वच्छता सर्वेक्षणामुळे जलजन्य आजारामुळे होणाऱ्या साथीस प्रतिबंध घालता येतो.- संतोश जोशी,  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तालुकानिहाय पाणी पुरवठा स्त्रोतांची संख्याअचलपूर १००,अमरावती १०९,अंजनगाव सुजी १२,भातकुली ७०,चांदुर बाजार ८०,चांदुर रेल्वे १२०,चिखलदरा २५९,दर्यापूर १३,धामनगांव रेल्वे ११७,धारणी २४१, मोर्शी १०२,नांदगाव खंडेश्र्वर १८८,तिवसा ११०,वरूड १३१,

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती