शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: लाचखोर सरपंचासह पतीला अटक, एसीबीची बिजुधावडी येथे कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: May 20, 2024 21:42 IST

Amravati: राहणीमान भत्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अढाव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह त्यांच्या पतीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई सोमवार, २० मे रोजी दुपारी बिजुधावडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर करण्यात आली.

- प्रदीप भाकरे अमरावती : राहणीमान भत्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अढाव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह त्यांच्या पतीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई सोमवार, २० मे रोजी दुपारी बिजुधावडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर करण्यात आली. जसमाय छोटेलाल मावस्कर (३८) व छोटेलाल सोनाजी मावस्कर (४२) दोघेही रा. अढाव असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर सरपंच व त्यांच्या पतीचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार यांना २०२० पासून राहणीमान भत्ता मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी राहणीमान भत्ता मिळण्याकरिता २ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे राहणीमान भत्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी सरपंच जसमाय मावस्कर यांच्याकडे गेले. त्यावेळी सरपंच जसमाय मावस्कर यांनी त्यांना धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या संदर्भात तक्रारदार यांनी १६ मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने १७ मे रोजी पडताळणी करण्यात आली.

पडताळणीत सरपंच जसमाय मावस्कर यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी दुपारी सापळा रचण्यात आला. बिजुधावडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती मागणी केलेली २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच सरपंच जसमाय मावस्कर व त्यांचे पती छोटेलाल मावस्कर यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्यांच्याविरुद्ध धारणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे व सतीश उमरे, प्रमोद रायपुरे, विद्या राऊत, शैलेश कडू, बारबुद्धे यांनी केली.

टॅग्स :AmravatiअमरावतीsarpanchसरपंचArrestअटक