अमरावती : भातकुली तालुक्यातील सायत येथील एका धाब्यासमोर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
भातकुली पोलिसांनी चौघांच्याही अपघाती मृत्यूला दुजोरा दिला आहे. सायत हे गाव भातकुली ते दर्यापूर मार्गावर असून अमरावती पासिंगची कार व अन्य एक कार भरधाव वेगामध्ये समोरासमोर धडकल्या. या भीषण धडकेमध्ये दोन्ही कारमधील चौघे जण मृत्युमुखी पडले. यातील दोघे अन्य करमधील तर दोघे जण अमरावती पासिंगच्या कारमध्ये होते. घटनास्थळी भातकुलीचे ठाणेदार राजू राजुलवार व त्यांचे पथक पोहोचले असून गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.
मृतांमध्ये मुकुंद काळे (50, यशोदानगर अमरावती), गोपाल राजपुरोहित (28,, रा. भातकुली), प्रेम बिष्णोई (रा. जोधपूर, राजस्थान) व जुनेद यांचा समावेश असल्याचे ज़िल्हा सामान्य रुग्णालयीन प्रशासनाने सांगितले. जुनेद व मुकुंद काळे हे एका कारमध्ये होते तर जुनेद हा कार चालवत असल्याचे समोर आले आहे. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले दोघांचा घटनास्थळी तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Web Summary : A head-on collision between two cars near Sayat village on Bhatkuli-Daryapur road resulted in two immediate fatalities and three critical injuries. The injured were rushed to Amravati General Hospital. Police are investigating, and the deceased are yet to be identified.
Web Summary : भातकुली-दर्यापुर मार्ग पर सायत गांव के पास दो कारों की टक्कर में दो लोगों की तत्काल मौत हो गई और तीन गंभीर रूप से घायल हो गए। घायलों को अमरावती जनरल अस्पताल ले जाया गया। पुलिस जांच कर रही है, मृतकों की पहचान अभी बाकी है।