शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : तळेगावच्या शतकोत्तर शंकरपटावर सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 21:18 IST

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपटावर सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीमुळे यंदा सावट उभे राहिले आहे

(अमरावती) धामणगाव रेल्वे / तळेगाव दशासर : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपटावर सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीमुळे यंदा सावट उभे राहिले आहे. विशेष म्हणजे यात सहभागी होणा-या ३०० बैलजोड्या शेतक-यांनी नांगरणीच्या कामाला लावल्या आहेत.

राज्यातील सामाजिक संस्थेने सर्वोच्च न्यायालयात गत सहा महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली होती़ त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील शंकरपटावर बंदी घातली. स्वातंत्र्यपूर्व काळात नानासाहेब देशमुख यांनी तळेगावात शंकरपटाला सुरुवात केली. त्यानंतर बापूसाहेब देशमुख व आता कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख त्यांचा वारसा टिकवून ठेवला. 

या पटासाठी शेतकरी खास बैल तयार करीत होते. शंकरपटात धावणा-या बैलांना राजा-सर्जा, शेरू-विरू, राजा-रॉकेट, शेरा-बादल, अशी नावे दिली जायची. घरातही पटशौकीन ही नावे आपल्या बैलांना वापरत असत. या बंदीमुळे पटशौकीनांत निरूत्साह दिसत आहे.

महिलांमध्ये नाराजी

पुरुषांप्रमाणेच महिलांचाही या शंकरपटात सहभाग असायचा. महिला राखीव पटात जोड्या जुंपणे, हाकणे, संचालन, घड्याळाची नोंद, जोड्यांची नोंदणी, निकाल, बक्षीस वितरण व स्वयंसेवक या सगळ्या भूमिका महिलाच पार पाडत असत़ देशातील हा अभिनव उपक्रम तळेगावातच  राबविला जायचा. त्यामुळेच देशविदेशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया या शंकरपटाची दखल घेत होते. 

तीन दाणी शंकरपट च्नानासाहेब देशमुख व त्यांच्या सहकाºयांनी गावाच्या उत्तरेस गायरानमध्ये शंकरपट भरविण्यास सुरूवात केली़ त्यावेळी दो-दाणी एकदिवसीय  शंकरपट होता़ दो-दाणी म्हणजे दोन दाणीवरून दोन बैलजोड्या एकाचवेळी सोडणे यातील जी जोडी कमी वेळेत अंतर पार करेल तिला बक्षीस, असे स्वरूप होते़ पुढे पटातील सहभागी जोड्यांची संख्या लक्षात घेता यात तीन गट पाडण्यात आले होते़ त्याला तीन दाणी म्हणतात.

शौकिनांत निरुत्साह च्सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्यामुळे या परिसरावरील ग्रामीण भागातील अर्थकारणावर मोठा परिणाम दिसून आला आहे़ शंकरपटावर हाकण्यात येणारे बैल आता नांगर व बंडीला जुंपावे लागत आहे़ गतवर्षी केंद्र सराकरने शंकरपटाला मंजुरी प्रधान केली होती़ त्यामुळे पट शौकीनांमध्ये उत्साह दिसत होता़ ‘पेटा’ ही संघटना न्यायालयात गेली आहे.

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यत