शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
2
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
3
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
4
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
5
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
6
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
7
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
8
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
9
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
11
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
12
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
13
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
14
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
15
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
16
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
17
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
18
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
19
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
20
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

Amravati | भातकुलीच्या लाचखोर 'एएसआय'वर एसीबीचा 'ट्रॅप'; हवालदारही अटकेत

By प्रदीप भाकरे | Updated: October 13, 2022 13:07 IST

भातकुली पोलीस ठाण्यातील प्रकार

अमरावती : चोरीच्या दाखल गुन्ह्यामध्ये अटक न करण्याकरता, अटक केले तर लवकर जामिन मिळविण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस उपनिरिक्षकासह हवालदाराला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. याप्रकरणी भातकुली पोलिसांनी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

 सहायक पोलीस उपनिरिक्षक गजानन प्रल्हादराव खुरकटे (५६) व हवालदार मोहम्मद इस्माईल शेख उमर(५२) असे लाचखोर पोलिसांची नावे आहेत. शहर आयुक्तालयातील भातकुली पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. आपल्या साळ्याविरूध्द भातकुली ठाण्यात शेतातील पाण्याची मोटर चोरीचा गुन्हा दाखल असून, त्यात त्याला अटक न करण्याकरता, अटक केले तर लवकर जमानात मिळवीण्याकरता मदत करण्याकरिता खुरकटे व मोहम्मद इस्माईल हे लाचेची मागणी करीत असल्याची लेखी तक्रार एकाने एसीबीकडे नोंदविली होती.

त्या अनुषंगाने पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान तक्रारदाराला खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. ३ ऑक्टोबर रोजी सापळा कारवाईदरम्यान आलोसे खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांना संशय असल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाचेची मागणी सिध्द झाल्याने १२ ऑक्टोबर रोजी दोघांनाही एसीबीने अटक केली.

एसपींच्या नेतृत्वात कारवाई 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत व देविदास घेवारे, उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष इंगळे व सतीश उमरे विनोद कुंजाम, निलेश महिंगे, युवराज राठोड, रोशन खंदारे,चालक सतीश कीटकुले, प्रदीप बारबुद्धे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणAmravatiअमरावतीPoliceपोलिसArrestअटक