शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

इर्विनमधून रुग्णानेच पळविली रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST

महामार्गावरील वाय पॉइंटजवळ अपघातात जखमी झालेल्या एका इसमाला मंगळवारी बडनेरा पोलिसांनीच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच धर्मेंद्र अभय कथडे (४५, भावसार चौक, चंद्रपूर) याने लॉक तोडल्यानंतर त्याच्याजवळील एका मास्टर चावीने रुग्णवाहिका भरधाव पळविली. जिल्हा सामान्य रुग्णालय ते बडनेरा सिंधी कॅम्प परिसर हे बारा किलोमीटरचे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार केले.

ठळक मुद्देबडनेरा येथे नागरिकांनी पकडले : उपचारासाठी पुन्हा केले दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णानेच तेथील रुग्णवाहिका बुधवारी सकाळी ७ वाजता पळवून नेली. सुसाट वाहनाला बडनेऱ्यात नागरिकांच्या सतर्कतेने पकडण्यात आले. सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. विशेष म्हणजे, रुग्णवाहिका पळविणाºया रुग्णाचा एक हात फ्रॅक्चर आहे.महामार्गावरील वाय पॉइंटजवळ अपघातात जखमी झालेल्या एका इसमाला मंगळवारी बडनेरा पोलिसांनीच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच धर्मेंद्र अभय कथडे (४५, भावसार चौक, चंद्रपूर) याने लॉक तोडल्यानंतर त्याच्याजवळील एका मास्टर चावीने रुग्णवाहिका भरधाव पळविली. जिल्हा सामान्य रुग्णालय ते बडनेरा सिंधी कॅम्प परिसर हे बारा किलोमीटरचे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार केले. सकाळच्या वेळी बडनेऱ्यात कार्यरत महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना भरधाव रुग्णवाहिका दृष्टीस पडली. हे वाहन एवढ्या वेगाने का जात आहे, हे पाहण्यासाठी काही लोक रुग्णवाहिकेच्या मागोमाग गेले. सिंधी कॅम्प परिसरात प्रकाश गिडवाणी यांच्या घरालगत ही रुग्णवाहिका एका वळणावर थांबली. चालकाच्या अंगात पुरेसे कपडे नव्हते. त्याच्या चेहऱ्याला व हाताला मार लागल्याचे पाहून सदर त्याने ही रूग्णवाहिका चोरल्याचे लक्षात येण्यास नागरिकांना वेळ लागला नाही. त्याला रूग्णवाहिकेतून उतरविल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. बडनेरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर व इतर कर्मचाºयांनी त्याला ताब्यात घेतले. जिल्हा सामान्य रुग्णालय हे सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने सदर रुग्णाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. रुग्णवाहिका पळवून नेणाऱ्या इसमाला पोलिसांनी पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, अशी माहिती आहे. भरधाव रुग्णवाहिकेमुळे दुर्घटना घडली नाही, हे पाहून शहरवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नगरसेवक प्रकाश बनसोड, स्वास्थ्य निरीक्षक सतीश राठोड, मंगेश गाले, अब्दुल अशफाक, राजू बग्गन, पम्मू असरे, पूनम बग्गन यांसह इतरही महापालिका कर्मचाºयांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग केला व चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी संवाद साधल्याची माहिती मिळाली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण वाऱ्यावर?जिल्हा सामान्य रुग्णालयाची रुग्णवाहिका पळवून नेणारा धर्मेंद्र कथडे वॉर्ड क्रमांक १५ मध्ये उपचार घेत होता. त्याने रुग्णवाहिका पळवून नेण्यापर्यंत मजल गाठली तरी रुग्णालय प्रशासनाला ही गंभीर बाब लक्षात येऊ नये, यावरून त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. रुग्ण वाºयावर सोडले का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

रुग्णवाहिका पळविणाऱ्याचा एक हात फ्रॅक्चरअकोला महामार्गावरील वाय पॉइंटवर मंगळवारी चालक असलेला हा रुग्ण जखमी अवस्थेत पडून होता. बडनेरा पोलिसांनीच त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्या एका हाताला फ्रॅक्चर असल्याने बँडेज बांधण्यात आले. एका हातानेच त्याने रुग्णवाहिका पळविली. त्याला मूळ गावी जायचे होते. तो काही दिवसांपासून शहरात फिरत होता.

टॅग्स :Thiefचोर