अंजनगाव सुर्जी : अमरावती जिल्ह्याकरिता आलेल्या नऊ रुग्णवाहिकांपैकी आमदार बळवंत वानखडे यांनी दोन रुग्णवाहिका दर्यापूर, अंजनगाव सुर्जीकरिता उपलब्ध केल्या. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आ. वानखडे यांच्या उपस्थितीत, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार बळवंत वानखडे, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद दाळू, दर्यापूर येथील जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव अभिजित देवके, खिरगव्हाणचे सरपंच पुरुषोत्तम घोगरे, तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार अनंतराव पोटदुखे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.रमेश रहाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर डोंगरे, शिवसेना उपशहरप्रमुख सचिन गावंडे, आरोग्य सभापती सचिन जायदे, सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक अशोक मोरे, संजय सरोदे, डॉ. अंकुश लोड, डॉ. नागपूरकर, सुधाकर खारोडे, जहीर बेग, आशिक अन्सारी, रमेश सावळे, कैलाश शिरसाठ, रुग्णवाहिका चालक रूपेश मेटकर तसेच ग्रामीण रुग्णालय कर्मचारी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
अंजनगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:14 IST