अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील श्री अंबादेवी व एकवीरा देवी आरती महामंडळतर्फे ३ हजार १११ किलो सुकामेव्याचा देवीला नैवेद्य मंगळवारी दाखविण्यात आला. बुधवारी नवमीच्या दिवशी या प्रसादाचे भक्तांना वाटप करण्यात आले. अष्टमीच्या दिवशी मंगळवारी रात्री १०.१५ वाजता एकवीरा देवी, अंबादेवीला सुकामेव्याचा नैवेद्य दाखविण्यात आला. या तयारीसाठी दोन्ही संस्थांच्या विश्वस्थांचे अथक परिश्रम लाभले. देवीला नैवेद्य दाखविताना भक्तांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा अंबादेवी, एकवीरा देवी आरती मंडळाच्यावतीने सुरू असल्याची माहिती अंबादेवी संस्थानचे विश्वस्थ विलास मराठे यांनी दिली. देवीला सुकामेवा नैवेद्य तयार करण्यास दरवर्षी वाढ होत असल्याचे दिसून येते. ही परंपरा मोठ्या आनंदात सुरू आहे.
अंबा-एकवीरेला ३,१११ किलो सुकामेव्याचा नैवेद्य
By admin | Updated: October 22, 2015 00:06 IST