शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

पालकमंत्र्यांनी सीपींना करविले अमरावती दर्शन !

By admin | Updated: September 22, 2015 00:14 IST

ऐतिहासिक वैभव लाभलेले अमरावती शहर हे देशातील 'स्मार्ट' शहर व्हावे,

गोपनीय पाहणी : प्रवीण पोटे झाले सारथी, शहरभर फेरीअमरावती : ऐतिहासिक वैभव लाभलेले अमरावती शहर हे देशातील 'स्मार्ट' शहर व्हावे, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या पालकमंत्री प्रवीण पोटे यांची सुरक्षित आणि शिस्तबद्ध शहरासाठीची आगळी तळमळ सोमवारी 'लोकमत'च्या कॅमेरात कैद झाली. सूर्य माथ्यावर आला होता. नजरेत भरणारे एक वाहन राजकमल चौकातील सिग्नलजवळ दाखल झाले. गॉगल लावलेली कुणी एक व्यक्ती वाहन चालवित होती. त्यांच्या शेजारी सामान्य वेशातील एक इसम बसले होते. निरखून बघितल्यावर वाहन चालकाच्या आसनावर दस्तुरखुद्द पालकमंत्री प्रवीण पोटे आसनस्थ असल्याचे दिसले. पालकमंत्रीच गाडी चालवितात म्हटल्यावर त्यांच्या बाजूची व्यक्ती कोण, हे बघण्याची उत्सुकता बळावली. ते शांत चेहऱ्याचे व्यक्ती होते, शहराचे पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर. अमरावती शहरात पहिल्यांदाच घडत असलेला हा गोपनीय अन् तितकाच आशादायी दौरा 'लोकमत'च्या कॅमेराने सर्वंकषरीत्या टिपला. राज्यातील उद्योग, पर्यावरण, खनीकर्म आणि बांधकाम खात्याला दिशा देत असताना मायभूच्या विकासासाठीची धडपड प्रवीण पोटे सातत्याने करीत असतात. नाव लिहा, गोपनीयतेची खात्री !'लोकमत'च्या माध्यमातून आवाहन करताना पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मी कटीबद्ध आहे. मला अनेक पत्र येतात. जशा वाहतुकीच्या तशाच मुलींच्या छेडखानी आणि गुंडगिरीच्याही समस्या लोक लिहून पाठवितात. पण, बहुतांश लोक निनावी पत्र पाठवितात. अशा पत्रांची दखल घेणे अवघड जाते. त्या तक्रारींची अधिकृतताच नसल्याने अधिक माहितीसाठी कुणाशीच संपर्क करता येत नाही. पुरावे एकत्रित करण्याच्या दृष्टीने प्रकरणाचा मागोवा घेता येत नाही. पत्रातील तक्रार खरी आहे की कुणी शत्रुत्व काढण्यासाठी लिहिलेली आहे, याबाबतचीही खातरजमा करता येत नाही. तक्रार करणाऱ्यांनी निर्धास्तपणे नावे लिहावीत. प्रत्येकच नाव गोपनीय राहील याची मी हमी देतो. शहरभरात बेशिस्त वाहतूक आहे. बरेचदा अशी वाहतूक जीवघेणी ठरते. पार्किंगची समस्या मोठी आहे. कारचालक पाच मिनिटांसाठी म्हणून रस्त्यावर कार उभी करून जातात. १५ मिनिटे परतत नाहीत. त्यामुळे वाहतूक तुंबते. अवैध व्यवसायही काही ठिकाणी दृष्टीस पडतात. अमरावती स्मार्ट सिटी होणार आहे. नागरिकांना सुरक्षित आणि कायदेसंगत वातावरण उपलब्ध करून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. शहरात काय सुरू आहे, हे पोलीस आयुक्तांनाच दाखविले तर त्यांना अचूक आणि प्रभावी उपाययोजना आखता येईल, असा विचार आला नि ही मोहीम राबविली. - प्रवीण पोटे, पालकमंत्री.पालकमंत्र्यांसोबत केलेल्या पाहणीत बरेच महत्त्वाचे तपशील लक्षात आलेत. अमरावतीकर वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. वाहतूक पोलीसदेखील त्यांचे कर्तव्य चोखपणे बजावत नाहीत. वाहतुकीला शिस्त कशी लागेल, यादृष्टीने अचूक ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यासाठी या पाहणी दौऱ्याचा खासा उपयोग होईल. मी रुजू झाल्यावर वाहतूक सुरळीत करण्याच्या मुद्द्याला हात घातला होता; तथापि २० टक्केच काम झाले आहे. ८० टक्के व्हायचे आहे, हे आज लक्षात आले. - राजकुमार व्हटकर, पोलीस आयुक्त.