अमरावती : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी रेल्वेखात्याचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र नवीन गाड्या सुरू केल्या नसल्या तरी जुन्याच मंजूर प्रकल्पांना पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी जिल्ह्यात रेल्वेचे प्रलंबित असलेले अनेक प्रकल्प मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रेल्वे अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या असताना नवीन काही घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली नाही. भाजप वगळता अन्य पक्षाने रेल्वे अर्थसंकल्पावर कडाडून टिका केली आहे. परंतु वर्षानुवर्ष रखडलेले रेल्वेचे प्रकल्प पूर्ण करण्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नरखेड रेल्वे मार्ग, राजापेठ रेल्वे उडाणपूल, अमरावती मॉडेल स्टेशनवर सोईसुविधा, बडनेरा येथील प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना आदी महत्वपूर्ण प्रकल्पांना गती मिळणार आहे. रेल्वेच्या रिकाम्या जागेवर संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होण्यासह रोजगाराचे दालनही मिळणार आहे. रिकाम्या जागेवर संकुल उभारण्याची संकल्पना खा. अडसूळ यांनी यापूर्वीच रेल्वेमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली होती. मॉडेल रेल्वे स्थानकासमोरीेल खुल्या जागेवर संकूल उभारले जाईल. जिल्ह्याला काय मिळाले?नरखेड ओव्हर ब्रीज १.५ कोटी, राजापेठ उड्डाणपूल १ कोटी, अमरावती टर्मिनल सुविधा १० लाख, टर्मिनल प्लॅटफॉर्मसाठी ४८.२३ लाख, अकोली रेल्वे टर्मिनल इमारत १ कोटी, बडनेरा व्हॅगन फॅक्टरी २४.५८ लाख, बडनेरा- वर्धा रेल्वे क्रॉसिंग उडाणपूल ५ कोटी, मॉडेल रेल्वेस्टेशनच्या तिन्ही प्लॅटफॉर्म वॉशिंग युनिटसाठी ३.७२ कोटी, भुसावळ-बडनेरा उडाणपूल ५ कोटी.वॅगन कारखान्याचा निधीचा प्रश्न सुटलाबडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचा निधीचा प्रश्न सूटला आहे. रेल्वे अर्थसंकल्पा २४.५० कोटी रुपये मंजुर झाले आहे. त्यामुळे या कारखान्याचे निर्माण कार्य सुरू होईल. रेल्वे अर्थसंकल्पात नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या नसल्या तरी अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प सोडला आहे. प्रवाशांना विविध सोईसुविधा देण्यासह अद्यावत प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला. - आनंदराव अडसूळ, खासदार.अमरावतीत भव्यदिव्य मॉडेल स्टेशन हे टर्मिनल आहे. येथून दर दिवसाला २५ गाड्यांची ये-जा शक्य होती. मात्र नवीन अर्थसंकल्पात कोणत्याही गाड्या सुरू करण्यात आल्या नाही. प्रवाशांची निराशा झाली. - अनिल तरडेजा, अध्यक्ष, यात्री संघरेल्वेचा अर्थसंकल्प विकासाभिमुख आहे. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करुन रेल्वेची साधन संपत्ती वाढविणारा आहे. प्रवाशांची दक्षता, सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. रेल्वेचे जाळे विणून सुविधा मिळेल. - प्रवीण पोटे, पालकमंत्री
नव्या गाड्या नाहीत तरीही विकासाला गती
By admin | Updated: February 27, 2015 00:16 IST