शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

युती सरकार शेतकरीविरोधी

By admin | Updated: April 1, 2017 00:08 IST

राज्यशासनाकडून संपूर्ण कर्जमाफी मिळविण्याकरिता तुम्हा शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्यक असून शेतकऱ्यांनी साथ दिली तर युती सरकारला हद्दपार करण्यास वेळ लागणार नाही.

पृथ्वीराज चव्हाण : संघर्ष यात्रेत कर्जमाफीसाठी विरोधकांचा हुंकारचांदूररेल्वे : राज्यशासनाकडून संपूर्ण कर्जमाफी मिळविण्याकरिता तुम्हा शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्यक असून शेतकऱ्यांनी साथ दिली तर युती सरकारला हद्दपार करण्यास वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातील युती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करीत नसून ते भांडवलदारधार्जीणे असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, जनता दल (यू), एमआयएम, पीरिपा (कवाडे) यापक्षांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून काढलेली संयुक्त संंघर्ष यात्रा गुरूवारी चांदूररेल्वे शहरात पोहोचल्यावर येथील जुन्या मोटार स्टँड मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आ.जयंत पाटील, माजीमंत्री पतंगराव कदम, आ. विश्वजीत कदम, आ.विजय वडेट्टीवार, आ.नितेश राणे, आ.शशिकांत शिंदे, आ.कुणाल पाटील, आ.अभिजित सानप, आ.अबू आझमी, आ. रणजित कांबळे, आ.हर्षवर्धन सपकाळ,आ. जितेंद्र आव्हाड, आ.यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे उपस्थित होते. पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सरकार भांडवलधारांचे लाखो ंकोटी रूपयांचे कर्ज माफ करण्याचे धोरण आखत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्याकडे योजना नाहीत. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाला ५० टक्के नफा होईल, असे शेतमालाचे दर ठरवू असे आश्वासन दिले होते.हेच का अच्छे दिनचांदूररेल्वे : मात्र, सत्तेत आल्यावर यासरकारची कर्ज माफ करण्याची इच्छाशक्ती नाही, असे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. मागील दोन वर्षांत साडेआठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करू असेही अश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, रोजगार मिळाला नाही. हेच का ‘अच्छे दिन’ असा सवालही त्यांनी केला. विधानसभेतील १९ आमदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून निलंबित के ले. त्यामुळे आता जनता दरबारात संयुक्तपणे हजर झाल्याचे त्यांनी सांगितले. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची मानसिकता कर्ज माफ करण्याची नाही, असा आरोप केला. ते म्हणाले, सत्ताधारीपक्षाने अंदाजपत्रकात शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची तरतूद केली नाही. विधानसभेत याचा विरोध करणाऱ्या आमदारांचे निलंबन केले. आमदार जनतेचे प्रतिनिधी आहेत. शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा हाप्रकार आहे. संघर्ष यात्रेला लोकांचा पाठिंबा मिळत असल्याने सरकार हतबल झाल्याचा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ जयंत पाटील म्हणाले की, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने कर्जमाफी झाली होती. आता संघर्ष यात्रा व विधानसभेत आमदारांचा हल्लाबोल यामुळे सत्ताधाऱ्यांनी कर्जकपातीचा निर्णय मागे घेतला आहे. यावेळी अन्य नेत्यांनी देखील सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीवर जोरदार हल्ला चढविला. यासभेसाठी नगराध्यक्ष सिद्धू सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुबे, सभापती प्रभाकर वाघ, उपसभापती अशोक चौधरी, गणेश आरेकर, कलवटे, भिंडे, सतपाल वरठे, गोविंदराव देशमुख, बंडू देशमुख, बंडू मुंदडा, प्रदीप वाघ यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आ. जगताप यांचे सरकारवर ताशेरेधामणगाव रेल्वेचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्याकडे संघर्ष यात्रेच्या चांदूररेल्वे येथील सभेच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी होती. त्यानुसार आमदार जगतापांनी युती सरकारवर जोरदार हल्ला केला. हे सरकार शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सभेला जमलेली गर्दी ही सरकारविरोधी असंतोष व्यक्त करणारी असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. क्षणचित्रे सभा सुरू होण्यापूर्वी सप्तखंजेरीवादक संदीपपाल महाराज यांनी शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचे चित्र कीर्तनाच्या माध्यमातून उभे केले.सभेसाठी ग्रामीण भागातील हजारो शेतकरी मिळेल त्या वाहनाने चांदूररेल्वे येथे आले होते.आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी जमलेली गर्दी पाहून ते तुमचेच काय तर आमचेही नेत आहेत, अशी पुष्टी सभेला संबोधित करताना सर्वच नेत्यांनी जोडली. सभेसाठी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आल्याने शहरात वाहनांची गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी शहरात येणारी वाहतूक चार तास रोखून धरली होती.