शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

सत्ता स्थापनेचा मुद्दा, पोलिसांना अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा मुद्दा रखडला आहे. सत्ता स्थापनेवरून राजकीय वातावरणात घमासान चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात निश्चित कालावधीपूर्वी सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देक्राईम मिटिंग : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभेचा निकाल लागूून दहा दिवस ओलांडलेत. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. येत्या आठवड्यात होऊ घातलेला अयोध्येतील राममंदिर व बाबरी मशिदीचा मुद्दा, पीएमसी बँक घोटाळा, अवकाळी पावसामुळे शेती पिके बुडाली, त्यांची आंदोलने, या सर्व पार्श्वभूमीवर गृहविभागाकडून अमरावती पोलिसांनीही सजग राहण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. सोमवारी पोलीस आयुक्तालयात आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांची बैठक बोलावण्यात आली. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी पोलीस निरीक्षकांना यासंबंधी सजग राहण्याच्या सूचना केल्यात.विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा मुद्दा रखडला आहे. सत्ता स्थापनेवरून राजकीय वातावरणात घमासान चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात निश्चित कालावधीपूर्वी सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी वर्तविली आहे. त्या अनुषंगानेही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सत्ता स्थापन न झाल्यास काय? यावर जनसामान्यांची नजर रोखली आहे. याबाबत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात संदेश व्हायरल होऊ लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. दरम्यान अयोध्या येथील मंदिर-मशिदीचा मुद्दाही सोशल मीडियावर जोर धरू लागला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यामुळे बँक वर्तुळात प्रचंड खळबळ आहे. बँकेतील पैसे काढून घ्या, इतपत संदेश व्हायरल केले जात आहे.या घडामोडींच्या अनुषंगाने सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांचा बाजार पाहता विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. यासंबंधाने गृहविभागाकडून पोलिसांना सूचना प्राप्त झाल्याची माहिती पुढे येत आहे.पोलिसांच्या सुट्टा रद्दविधानसभा निवडणुकीत पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या होत्या. दिवाळीनंतर पोलिसांना सुट्या देण्यात आल्या. २५ ते ३० टक्के पोलीस सुटीवर गेले होते. मात्र, आता आगामी सण-उत्सवात ईद, गुरुनानक जयंतीनिमित्त पोलिसांना शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज राहावे लागणार आहेत. त्यातच सत्ता स्थापनेचा पेच व अयोध्येचा मुद्दा पुढे असल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस महासंचालकाच्या आदेशाचे संदेश पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसू लागले आहेत. त्यामुळे ज्यांना सुटी घ्यायची होती, ते पोलीस आता चिंतेत पडल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू असल्याचे बोलले जात आहे.अफवांवर विश्वास ठेवू नकासोशल मीडिया, व्हाट्सअ‍ॅप समूहावर सत्ता स्थापनेविषयी व अयोध्येत राम मंदिर व बाबरी मशिद या मुद्द्यावर विविध प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. या संदेशावर व अफवांवर विश्वास ठेवू नका, आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन तयारीत असून, जनसामान्यांनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी केले आहे.

टॅग्स :Policeपोलिस