लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील सत्ता स्थापनेपूर्वी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलीस यंत्रणेला अलर्ट देण्यात आला होता. आता शनिवारी सकाळपासून मुंबईत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, या दृष्टीने पुन्हा पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. राजकीय वातावरण पाहता, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. तिन्ही पोलीस उपायुक्त आठ ठिकाणी फिक्स पॉइंट लावले गेले, तर प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत स्ट्रायकिंग फोर्स सज्ज ठेवण्यात आले आहे. यशोदानगर, पंचवटी चौक, राजकमल चौक, इर्विन चौक, बडनेरा, गद्रे चौक या ठिकाणी एक पोलीस अधिकारी व दहा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय सर्व ठाण्यांच्या हद्दीत २० मार्शलची पथके व सीआर व्हॅन सतत गस्त लावीत आहेत तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांची कार्यालये व नेत्यांच्या घरांनासुद्धा सुरक्षा प्रदान केली जात आहे.पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्दसत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. याकरिता पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून शहरात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. सकाळपासून फिक्स पॉइंट व अन्य बंदोबस्त लावण्यात आला आहे.- यशवंत सोळंकेपोलीस उपायुक्त
सत्तास्थापनेकडे लक्ष पोलीस पुन्हा अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST
सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. राजकीय वातावरण पाहता, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. तिन्ही पोलीस उपायुक्त आठ ठिकाणी फिक्स पॉइंट लावले गेले, तर प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत स्ट्रायकिंग फोर्स सज्ज ठेवण्यात आले आहे.
सत्तास्थापनेकडे लक्ष पोलीस पुन्हा अलर्ट
ठळक मुद्देशहरात आठ फिक्स पॉर्इंट : १० ठाण्यांच्या हद्दीत स्ट्रायकिंग फोर्स सज्ज