शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ आरोग्य यंत्रणेला अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:01 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित देशातून आलेल्या प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरू झालेले आहे. पुणे स्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) मध्ये आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे. शहरात या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असली तरी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण, निदान आणि उपचार सक्षम करणे आवश्यक असल्याचे आरोग्य संचालकांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेची खबरदारी : आरोग्य संचालनालयाद्वारे मार्गदर्शन जारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चीनमधील कोरोना विषाणूमुळे राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाद्वारे महापालिकेला दक्षतेबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार महापालिका आरोग्य विभाग दक्ष असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित देशातून आलेल्या प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरू झालेले आहे. पुणे स्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) मध्ये आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे. शहरात या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असली तरी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण, निदान आणि उपचार सक्षम करणे आवश्यक असल्याचे आरोग्य संचालकांनी स्पष्ट केले आहे. इन्फ्ल्यूएन्झासदृश रुग्ण आणि श्वसनसंस्थेचा तीव्र प्रादुर्भाव असलेल्या आजाराचे सर्वेक्षण सर्व आरोग्य यंत्रणांनी करणे आवश्यक आहे. यामध्ये अचानक येणारा तीव्र ताप, खोकला, घसा बसणे, श्वसनास अडथळा तसेच पाच वर्षांखालील वयोगटात न्यूमोनिया असल्यास रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे.निदानासाठी रुग्णाचे कोणते नमुने घ्यावेत, ते प्रयोगशाळेत कसे पाठवावेत, याची माहिती एनआयव्हीच्या संकेत स्थळावर दिली आहे. हे नमुने सीएसमार्फत राज्य आयडीएसपी यांच्या अनुमतीने पाठवावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालय स्तरावर संसर्ग प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. यामध्ये हात धुण्याची व्यवस्था, पीपीईची पुरेशी उपलब्धता, जैव-वैद्यकीय कचºयाची सुयोग्य विल्हेवाट या बाबींकडे विशेष लक्ष व सुसज्ज विलगीकरण कक्ष महत्त्वाचे आहे. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर व जीवनावश्यक प्रणाली सुविधा सक्षमपणे कार्यरत राहील, याची दक्षता महत्त्वाची आहे.काय आहे करोना विषाणू?साध्या सर्दी-खोकल्यापासून ते मर्स किंवा सार्ससारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणाºया एका विशिष्ट प्रकारच्या विषाणू गटास ‘करोना’ विषाणू म्हणतात. सन २००३ मध्ये आढळलेला सार्स हादेखील करोना विषाणूच होता. सध्या चीनमध्ये आढळलेला विषाणू करोनाच आहे. तथापि, त्याची जनुकीय रचना पूर्णपणे नवीन असल्याने त्यास ‘नॉव्हेल करोना’ असे नाव देण्यात आले. कॉमन कोल्ड, श्वसन आजाराची गंभीर लक्षणे, श्वास घ्यायला अडथळा, न्यूमोनिया, अतिसार, काही रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे ही लक्षणे आढळतात.प्रतिबंधक खबरदारी महत्त्वाचीविषाणूचा उद्भव अणि प्रसार माहीत नसले तरी प्रतिबंधक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. श्वसनसंस्थेशी निगडित व्यक्तींचा सहवास टाळावा. हातांची नियमित स्वच्छता ठेवावी. न शिजविलेले अन्न अथवा कच्चे मांस खाऊ नये. फळे, भाज्या न धुता खाऊ नये. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर टिश्यू पेपरचा वापर करावा व हे टिश्यू पेपर झाकण असलेल्या कचरापेटीत टाकावे आदी खबरदारी आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना