अमरावती : बडनेरा पोलिसानी येथील अंजनगाव बारी मार्गावर कारवाई करून २० हजारांची दुचाकी व अवैध दारू असा एकूण २१ हजार ७६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. अंकुश गुलाबराव हटवार(२९, रा. मायानगर), जगदीश जयस्वाल (रा. अंजनगावबारी) विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-----------------------------------------------
समतानगरात दारू पकडली
अमरावती : वलगाव पोलिसांनी समतानगर येथे कारवाई करून ८८४ रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. याप्रकरणी एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------------------------
कुंड सर्जापूर येथे अवैध दारूवर धाड
भातकुली : शहर गुन्हे शाखेने येथील कुंड सर्जापूर येथे कारवाई करून दुचाकीसह ५४ हजार २०० रुपयांची अवैध दारु जप्त केली. आरोपी आकाश प्रकाश मोहोड (२४), नितेश भाऊराव वानखडे(२७, दोन्ही रा. मलकापूर) विरुद्ध गुन्हा नोंदविला. आरोपीला नागपुरीगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
-----------------------------------------------------------
पुसदा येथे अवैध दारू पकडली
वलगाव : स्थानिक पोलिसांनी पुसदा येथे कारवाई करून ११ हजार २०० रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे. ही कारवाई पुसदा येथे पाटीपुऱ्यात शनिवारी करण्यात आली. आरोपी राजू उत्तमराव इंगळे (४७) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-------------------------------------
रहाटगाव येथे दारू पकडली
अमरावती : नवी वस्ती रहाटगाव येथे नांदगावपेठ पोलिसांनी कारवाई करून ४२० रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. याप्रकरणी आरोपी नीलेश प्रल्हादराव थोटे (३५, रा. बडनेरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.