शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकारण झालेल्या वादात अजयने गमावला जीव; दोघांना अटक

By प्रदीप भाकरे | Updated: December 29, 2023 14:05 IST

इर्विन चौकात खून : दोन आरोपींना अटक, दोन फरार

अमरावती : स्थानिक इर्विन चौकातील चहा कॅंटिनसमोर एका ३० वर्षीय तरूणाला अकारण जीव गमवावा लागला. २८ डिसेंबर रोजी रात्री १.३० च्या सुमारास ती घटना घडली. अजय विठ्ठल कंगाले (३०, रा. समाधाननगर) असे मृताचे नाव आहे. त्याच्या पोटात चाकू भोसकण्यात आला. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी पहाटे आरोपी नवनीत संतोष पवार, उज्वल चव्हाण, आकाश सुरोसे (तिघेही रा. हमालपुरा) व आकाश हरले (रा. गाडगे नगर) यांच्याविरूध्द खून, खुनाचा प्रयत्न व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पैकी उज्वल चव्हाण व व आकाश सुरोसे यांना अटक करण्यात आली.            या प्रकरणी, अरविंद आबरावजी इंगोले (४०, केवल कॉलनी अमरावती) याने तक्रार नोंदविली. या घटनेत अरविंद देखील गंभीर जखमी झाला. अरविंद हा त्याच्या मित्रासोबत दारू पिण्याकरीता करण बार येथे गेला असताना आरोपी नवनीत पवार तेथे आला. त्याने अकारण अरविंदला शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. तो वाद अरविंदच्या मित्रांनी सोडवला. त्यानंतर अरविंद हा मित्रांसमवेत तेथून निघून पुढे एका बिअर शॉपीमध्ये जाऊन दारू पिले. अरविंदचा मित्र योगेश चोरे तिथून निघून गेला. रात्री १.३० च्या सुमारास अरविंद इंगोले, सचिन सदावर्ते व अजय कंगाले हे इर्विन चौकातील रसूल यांच्या चहा कॅन्टिनवर आले. ते आपसात बोलत असताना तेथे आरोपी नवनीत पवार, आकाश हरले, आकाश सुरोसे व उज्वल चव्हाण हे त्यांच्या दुचाकीने आले. आकाश हरले याने अजय कंगाले व अरविंदच्या पायाला तसेच हातावर लोखंडी रॉड मारला. तर उज्वल चव्हाण व आकाश सुरोसे यांनी अजय कंगाले याला पकडून ठेवले. नवनीत संतोष पवार याने अजय कंगाले याच्या पोटात चाकू भोसकला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती