शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
6
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
7
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
8
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
9
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
10
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
11
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
12
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
13
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
14
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
15
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
16
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
17
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
18
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
19
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
20
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात

अचलपूरचे माजी उपाध्यक्ष अजय लकडे यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:41 IST

अचलपूर येथील लब्धप्रतिष्ठित युवा शेतकरी तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय पुरुषोत्तम लकडे (३६, रा. अब्बासपुरा) यांचा धारणी मार्गावरील बिहालीजवळ कारमध्ये मंगळवारी पहाटे ५ वाजता मृतदेह आढळल्याने जुळ्या शहरांत एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देबिहालीनजीक कारमध्ये मृतदेह आढळला : विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर येथील लब्धप्रतिष्ठित युवा शेतकरी तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय पुरुषोत्तम लकडे (३६, रा. अब्बासपुरा) यांचा धारणी मार्गावरील बिहालीजवळ कारमध्ये मंगळवारी पहाटे ५ वाजता मृतदेह आढळल्याने जुळ्या शहरांत एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या कारमध्ये विषारी औषधांच्या दोन बॉटल व इंजेक्शन आढळून आले. त्यांनी विष प्राशून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.अजय लकडे हे सोमवारी बाजार समितीच्या गाळ्यांच्या लिलावादरम्यान उपस्थित होते. त्यानंतर ते घरी गेले. सायंकाळी ५ वाजता एक-दीड तासात येतो, असे सांगून घरून निघाले होते. मात्र, उशिरा रात्रीपर्यंत न आल्याने कुुटुंबीय व मित्रमंडळींनी रात्रभर शोधमोहीम चालविली. पोलिसांत तशी माहिती देण्यात आली. परतवाडा, अचलपूर, अमरावती, चांदूर बाजार, अंजनगाव, बैतुल आदी परिसरात रात्रभर शोध घेऊनसुद्धा ते सापडले नाहीत.मंगळवारी पहाटे ५ वाजता धारणी मार्गावर बिहाली येथे अजय लकडे यांची एसयूव्ही (एमएच २७ बीई ६५६५) आढळली. त्यामध्ये त्यांचा मृतदेह होता. बाजूला दोन विषारी औषधांच्या बॉटल व इंजेक्शन सापडले. त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्राथमिक अहवालात पुढे आले. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह परिजनांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शेकडोंच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यापूर्वी अजय लकडे यांचे अपहरण झाल्याची चर्चाही शहरात पसरली होती. त्यांचे अखेरचे मोबाइल लोकेशन हे अचलपूर शहरातच येत होते.कारमध्ये सापडले इंजेक्शन, विषारी औषधअजय लकडे यांच्या कारमध्ये पोलिसांना एक इंजेक्शन आणि दोन औषधीच्या बॉटल आढळून आल्या. त्यांनी हे औषध घेऊन आत्महत्या केली की त्यांची इंजेक्शन देऊन हत्या करण्यात आली, याचा तपास सुरू आहे. चिखलदरा पोलिसांनी मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणल्यावर शवविच्छेदन करण्यात आले. अजय लकडे यांनी विष प्राशून आत्महत्या केल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले, असे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जाकीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अजय लकडे यांचा मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणताच जुळ्या शहरातील नागरिकांसह नातेवाईक आणि कुुटुंबातील सदस्यांनी तेथे एकच गर्दी केली होती.आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातअचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांतील सर्वात गर्भश्रीमंत शेतकरी म्हणून लकडे कुटुंबाकडे पाहिले जाते. त्यामुळे आर्थिक व्यवहारातून त्यांनी आत्महत्या केली नसल्याची चर्चा आहे. या युवा व्यापारी वजा शेतकऱ्याने कुठल्या कारणाने थेट आत्महत्यासारखे पाऊल उचलले, याची चौकशी करण्याचे आव्हान चिखलदरा पोलिसांपुढे आहे.अद्रक, हळद उत्पादक म्हणून ख्यातीलब्धप्रतिष्ठित युवा शेतकरी म्हणून अजय लकडे यांची ओळख होती. संत्रा पॅकिंग सेंटर, हळद, अद्रक आदी पिकांचे मोठे उत्पादक व व्यापारी म्हणून लकडे कुटुंबाची ख्याती आहे. त्यांच्या पश्चात वडील पुरुषोत्तम लकडे, आई, भाऊ अतुल, पत्नी अश्विनीसह मैथिली व सान्वी या दोन मुली आहेत.अजय लकडे यांच्या मृतदेहाजवळ इंजेक्शन व दोन विषारी औषधांच्या बॉटल सापडून आल्या. आत्महत्येचे नेमके कारण अजून पुढे आले नाही. तपास सुरू आहे.- आकाश शिंदे,ठाणेदार, चिखलदरा