अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवपदाचा पदभार अजय देशमुख यांनी मंगळवारी स्विकारला. यावेळी कुलगुरू मोहन खेडकर, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, प्रभारी वित्त व लेखाधिकारी दिनकर राऊत, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर यांनी त्यांचे कुलगुरूंच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कुलसचिव अजय देशमुख हे अचलपूर येथील स्व.छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालयात प्राचार्य होते. यापूर्वी त्यांनी विद्यापीठात बीसीयूडी संचालकपदाचा कार्यभार सांभाळला. यापूर्वी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून श्रीकृष्ण चौबे, गु.ल. जगताप, सी.डी. देशमुख, वि.गो. भांबूरकर, कै.ग्या. खामरे, प्र.शं. नारखेडे, व्ही.के. मोहोड, भी.र.वाघमारे, जे.एस. देशपांडे, दिनेशकुमार जोशी, अशोक चव्हाण यांनी पदभार सांभाळला.
कुलसचिवपदाचा अजय देशमुख यांनी पदभार स्वीकारला
By admin | Updated: September 2, 2015 00:07 IST