शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

‘अजाती’नेही झाला नाही जातीचा अंत! मंगरुळ दस्तगीर येथील २५ कुटुंबांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 15:55 IST

जन्म, मृत्यू, शाळा, शेती अशा कोणत्याच दाखल्यावर ज्यांच्या जातीचा उल्लेख नाही, असे एकाच गावातील २५ कुटुंब ‘अजात’ नावाने आजही ओळखले जातात.

-  मोहन राऊत

अमरावती - जन्म, मृत्यू, शाळा, शेती अशा कोणत्याच दाखल्यावर ज्यांच्या जातीचा उल्लेख नाही, असे एकाच गावातील २५ कुटुंब ‘अजात’ नावाने आजही ओळखले जातात. अजातीनेही जातीचा अंत होऊ शकला नसल्याची व्यथा धामणगाव तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथील त्या २५ कुटुंबातील सदस्य बोलून दाखवितात.  ‘पुरोगामी महाराष्ट्रा’त सध्या सुरू असलेला जातीय आरक्षणाचा संघर्ष पहिला की, जातीचा अंत तर दूरच, उलट जातीय अस्मिता अधिक टोकदार झाल्याचे जाणवते. अशावेळी आठवण होते ती धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील गणपती महाराजांची, ज्या एकाच गावातील २५ कुटुंब अजात आहेत. विदर्भात विशेष म्हणजे अभेद्य अशा वर्ण व्यवस्थेतून जातींचे बुरुजे उभे असतानाच्या स्वातंत्रपूर्व काळात जातिअंताची ही चळवळ उभी केली मंगरूळ दस्तगीर या मुंडांच्या गावात गणपती ऊर्फ हरी महाराज या अवलियाने. १९१५ ते १९३५ या दोन दशकात जात मोडण्याची मोहीम चालली. आपल्या सहका-यांपासून तर अनुयायापर्यंत जात सोडण्याचा आग्रह त्यांनी धरला. ‘अजात’ होण्याचा मंत्र दिला. गणपती महाराज हे वारकरी संप्रदायाचे होते. ज्या चंद्रभागेच्या काठावर जातीपातीच्या पलीकडे जाऊन वैष्णवजण विठुनामाच्या जयघोषाने पंढरी दणाणून सोडतात, तोच गजर गणपती महाराजांना गावागावांत हवा होता. यासाठी त्यांनी १९२५ च्या काळात मंगरूळ दस्तगीर गावात विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर उभारले. त्यांच्या अनुयायांनी ‘अजात’ चळवळ पुढे सुरू ठेवली. शाळांमध्ये आपल्या मुलींचे नाव टाकताना जातीचा रकाना मोकळा सोडला. मात्र, काळ बदलत गेला आणि जातीच्या रकान्यात ‘अजात’ हा उल्लेख आला. यामुळे ही सामाजिक सुधारणा होण्याऐवजी सामाजिक समस्या बनली.  गणपती महाराज यांनी चालवलेली चळवळ आज काही प्रमाणात कायम आहे. आमच्या २५ कुटुंबाच्या दस्तावेजावर  जातीचा उल्लेख नाही. आमची अजात म्हणून असलेली नोंद आजही कायम आहे. - श्याम भबुतकर, गणपती महाराज यांचे नातू, रा. मंगरूळ दस्तगीर

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रAmravatiअमरावती