शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

एजन्सी मॅनेजरकडून विम्याच्या रकमेची अफरातफर

By admin | Updated: December 25, 2015 01:01 IST

एसबीआय लाईफ इंशुरन्स कंपनीच्या एजंसी मॅनेजरने ग्राहकांकडून घेतलेल्या विम्याच्या रकमेत अपहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

एसबीआय इंशुरन्समधील प्रकार : फ्रेजरपुऱ्यात गुन्हा दाखलअमरावती : एसबीआय लाईफ इंशुरन्स कंपनीच्या एजंसी मॅनेजरने ग्राहकांकडून घेतलेल्या विम्याच्या रकमेत अपहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. संजय चांदपूरकर असे आरोपीचे नाव असून त्याने २ लाख ८७ हजार २४१ रुपयांचा अपहार करुन कंपनीची आणि ग्राहकांची फसवणूक केल्याची तक्रार एसबीआय लाईफ इंशुरन्स कंपनीच्या स्थानिक कार्यालयाचे व्यवस्थापक सुंदरनारायण जोशी यांनी दिली आहे. १७ पेक्षा अधिक ग्राहकांना आरोपी संजयने बनावट पावत्या दिल्या व रक्कम स्वीकारली. येथील रुक्मिणीनगर परिसरात सन २००८ पासून एसबीआय लाईफ इंशुरन्सची शाखा कार्यरत असून विमा ग्राहकांकडून प्रिमियम गोळा केले जाते. त्यासाठी विविध लोक कार्यरत आहेत. या कार्यालयातून दरवर्षी ३ ते ४ कोटींचे विमा हप्ते गोळा केले जातात. सन २०१३ साली आरोपी संजय चांदपूरकर या विमा कंपनीत कंपनीत एजन्सी व्यवस्थापक म्हणून रुजू झाला. व्यवसायातून ग्राहकांशी त्यांचे संबंध जुळले. त्याच ओळखी आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने पॉलिसीधारकांकडून रक्कम स्वीकारण्याकरिता बनावट पावत्या तयार केल्या. १७ हून अधिक ग्राहक २० आॅक्टोबर ते पुढील काळात त्याने या पावत्यांचा वापर करुन विमा प्रिमियमची रोख रक्कम स्वीकारली व ती रक्कम कंपनी वा ग्राहकांच्या खात्यात जमा न करता स्वत:च अपहार केला. याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या स्तरावर चौकशी करुन २२ आॅक्टोबरला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनीही तब्बल २ महिने चौकशी केल्यानंतर २३ डिसेंबरला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तक्रार नोंदवून घेत संजय चांदपूरकर याच्याविरुद्ध कलम ४०६, ४६८, ४७१ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला.