शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पुन्हा २४ तास संचारबंदी; खुनाचे दोन गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

पहिल्या घटनेतील मृत श्याम खोलापूरे (नंदवंशी) (३८, रा. महावीर चौक, शक्ती स्वीट मार्टलगत, परतवाडा) याच्या खुनाबद्दल मृताचा भाऊ शुभम नंदलाल नंदवंशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी साजिद हेला, जावेद वहीद, शाहरूख, परवेज परू बेग, अण्णा व हर्शीदखाँ रहमतखाँ व एका अल्पवयीनासह सात जणांविरुद्ध भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देमृतांवर बंदोबस्तात अंत्यसंस्कार : इनकॅमेरा शवविच्छेदन, मंगळवारी सायंकाळी पुन्हा दगडफेक, अफवांचा बाजार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : परतवाडा शहरात सोमवारी घडलेल्या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत, तर घटनेतील तीनही मृतांवर मंगळवारी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले. अंतिम संस्कारापूर्वी त्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन केले गेले. दरम्यान जुळ्या शहरात तणाव कायम असल्याने बुधवार दुपारपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे.पहिल्या घटनेतील मृत श्याम खोलापूरे (नंदवंशी) (३८, रा. महावीर चौक, शक्ती स्वीट मार्टलगत, परतवाडा) याच्या खुनाबद्दल मृताचा भाऊ शुभम नंदलाल नंदवंशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी साजिद हेला, जावेद वहीद, शाहरूख, परवेज परू बेग, अण्णा व हर्शीदखाँ रहमतखाँ व एका अल्पवयीनासह सात जणांविरुद्ध भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात हर्शीदखाँ रहेमानखा याला पोलिसांनी अटक केली.घटनेनंतर उसळलेल्या उपद्रवात मो. अतिक मो. रफीक व सैफ अली म. कमाल यांच्या मृत्यूप्रकरणात दुसरा गुन्हा सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलिसांनी दाखल करून घेतला. यात मो. शफीक मो. रफीक (रा. नबाब मार्केट, परतवाडा) यांच्या फिर्यादीवरून महात्मा ठाकूर, शेरा, चेतन हिवरकर, कालू यादव, शुभम ऊर्फ बम नंदवंशी व इतर आठ ते दहा जणांविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३२४, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, मृतक सैफ अली मो. कलाम याच्या मृतदेहावर सोमवारी मध्यरात्रीनंतर अचलपूर मार्गावरील दर्गाह परिसरात पोलीस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला.मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मृत श्याम खोलापुरे (नंदवंशी) याचा मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून तगड्या बंदोबस्तात त्याचे राहते घरी आणला गेला. तेथून लगेच पोलीस बंदोबस्तात सकाळी १०.३० वाजता त्याची शवयात्रा काढली गेली. या शवयात्रेच्या पुढे खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे, अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे यांच्यासह शंभर ते दीडशे पोलीस कायदा व सुव्यवस्था सांभाळून होते. या शवयात्रेत दोन ते अडीच हजार लोक सहभागी झाले होते. यादरम्यान हिंदू स्मशानभूमी परिसरातही तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास नमाजानंतर मृत मो. अतिक मो. रफीक यावर पोलीस बंदोबस्तात बैतूल रोडवरील मुस्लीम दफनभूमीत दफनविधी पार पाडला गेला. या अंत्ययात्रेदरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे परतवाडा पोलीस ठाण्यात उपस्थित होते.दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण दहा जणांना अटक करण्यात आली. त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पालकमंत्र्यांनी मंगळवारी दुपारनंतर शहराला भेट दिली.दरम्यान, जुळ्या शहरांतील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, बळी पडू नये, असे आवाहन आयजी मकरंद रानडे यांनी केले.मंगळवारीही दगडफेकमंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हबीबनगर, मुगलाईपुरा, स्वस्तिकनगर, नाईक प्लॉट परिसरात तणाव वाढला. जयस्तंभ, आठवडी बाजाराकडून शहरात येणारे रस्ते पोलिसांनी बंद केले. दगडफेक आणि शस्त्र काढल्याच्या ही घटना घडल्यात. आयजी मकरंद रानडे परत शहरात दाखल झाले. पोलिसांवर दगडफेक झाली. ५० दुचाकींवर १०० हेल्मेटधारी पोलीस दंडुके घेऊन फिरत आहेत.अन्सार नगरातून १२ सशस्त्र व्यक्ती ताब्यातघटनेनंतर अचलपूर, परतवाडा या दोन्ही शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सीआरपीएफ, एसआरपीएफ, दंगा नियंत्रण पथकाच्या तुकड्या शहरात तैनात आहेत. दोन्ही शहरांना पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मृतदेहाचे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. मडावी, डॉ. मिराज अली व डॉ. जवंजाळ या अधिकाऱ्यांनी इनकॅमेरा शवविच्छेदन केले. शहरातील संचारबंदी बुधवारी दुपारपर्यंत राहील. दरम्यान मंगळवारी रात्री अन्सार नगर भागातून १२ सशस्त्र व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिस