पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पोहरा वतुर्ळातील परसोडा बीट वनखंड क्रमांक ७७ या परिसरातील परसोडा येथील बशीर शेख (रा. परसोडा) यांच्या मालकीची गीर जातीची एक मोठी गाय बिबट्याने गोठ्यात घुसून ठार केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
गावातील काही नागरिकांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनाखाली परसोडा बीटचे वनरक्षक प्रदीप आखरे यांनी घटनास्थळ गाठून पशुमालकांशी चर्चा केली व घटनास्थळी पंचनामा केला. गाईच्या अंगावर बिबट्याच्या नखाचे ओरखडे दिसून आल्याने बिबट्यानेच शिकार केल्याचे वनविभााने स्पष्ट केले. पशुमालकांनी वनविभागाकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज सादर केला आहे.
--------