शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

बृहन्मुंबई महापालिकेनंतर आता अमरावतीला निवडणुकीचे वेध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 05:01 IST

नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टू अपिल (सी) क्र. १९७५६/२०२१ मध्ये १९ जानेवारी रोजी झालेल्या आदेशानुसार राज्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबतची आकडेवारी संबंधित मागासवर्ग आयोगास द्यावी, मागासवर्ग आयोगाने सदर आकडेवारी तपासून त्यानुसार योग्य त्या शिफारशी राज्याला तसेच राज्य निवडणूक आयोगास कराव्यात, असे आदेशित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागांच्या सीमांची प्रसिद्धी, हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे आदी कार्यक्रम जाहीर केला आहे. १ फेब्रुवारी ते २ मार्च अशी ‘डेडलाईन‘ निश्चित केली आहे. त्यामुळे आता अमरावती महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत हरकती, सूचना घेण्यासंदर्भात वेध लागले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीबाबत कार्यक्रम जाहीर हाेण्याचे संकेत आहेत.अमरावती महापालिकेत निवडणुकीत २०२२ च्या निवडणुकीत ९८ सदस्य निवडीसाठी प्रक्रिया राबविली जाणार आहे. सन २०११ च्या आकडेवारीनुसार अमरावती शहराची लोकसंख्या ६ लाख ४७ हजार ७५ गृहीत धरली जाणार आहे. सध्या महापालिकेत ८७ सदस्यसंख्या आहे. दरम्यान, सहा लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंतच्या लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ९६ व कमाल संख्या १२६ पेक्षा अधिक नसेल, असे नवे निकष लावण्यात आले आहे. त्याअनुषंगाने ९८ सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. राजकीय पक्षांसह स्वतंत्रपणे उभे राहू इच्छिणाऱ्या संभाव्य उमेदवार प्रशासनाच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहेत. 

प्रभागाच्या सीमा प्रसिद्ध हरकतींना प्राधान्यओबीसींच्या शिफारशी प्राप्त होण्यास अथवा योग्य तो निर्णय घेण्यास कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी निवडणुकांचे कामकाज विहीत कालावधीत पूर्ण करणे, निवडणूक प्रहरी निश्चित करण्यापूर्वी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी प्रथम निवडणूक प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करून त्यावरील हरकती व सूचना प्राप्त करून सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने २७ जानेवारी रोजी सुधारित आदेश जारी केला. 

ओबीसी आरक्षणाचा मार्ग झाला सुकर नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टू अपिल (सी) क्र. १९७५६/२०२१ मध्ये १९ जानेवारी रोजी झालेल्या आदेशानुसार राज्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबतची आकडेवारी संबंधित मागासवर्ग आयोगास द्यावी, मागासवर्ग आयोगाने सदर आकडेवारी तपासून त्यानुसार योग्य त्या शिफारशी राज्याला तसेच राज्य निवडणूक आयोगास कराव्यात, असे आदेशित केले आहे. 

एक प्रभागात १७ ते २१ हजार लोकसंख्याअमरावती महापालिकेची निवडणूक ९८ सदस्यांसाठी होणार आहे. तीन सदस्यीय प्रभाग प्रणालीनुसार एकूण ३३ प्रभागांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. यात ३२ प्रभागांमध्ये तीन सदस्य, तर एका प्रभागात दोन सदस्य निवडून  महापालिकेत जातील. ३३ प्रभागात ९८ नगरसेवक अशी नवीन रचना असणार आहे. 

एप्रिल अथवा मे महिन्यात निवडणूक बृहन्मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुका २०२२ प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता व निवडणूक प्रभागांच्या सीमा जाहीर करून हरकती व सूचना मागविणे आणि सुनावणी देण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिलच्या शेवटी अथवा १५ मे दरम्यान होईल, असे संकेत आहेत.

बृहन्मुंबई महापालिकेसाठी स्वंतत्र कायदा आहे. हीच नियमावली अमरावती महापालिकेला लागू होईल, असे नाही. मात्र, फेब्रुवारीत प्रभागांच्या सीमांची प्रसिद्धी, हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे आदी कार्यक्रम जाहीर होईल, असे संकेत आहेत.- प्रवीण आष्टीकर, आयुक्त, महापालिका

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक