अखेर राजापेठ बसस्थानक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:34 PM2018-05-21T23:34:57+5:302018-05-21T23:35:19+5:30

स्थानिक राजापेठ येथे साकारण्यात आलेल्या नवनिर्मित छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकाहून बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर आ. रवी राणा यांनी प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्याच्या उद्देशाने प्रवाशांना थंड ताकाचे पाकीट वाटप केले.

After all, Rajapeth bus station has started | अखेर राजापेठ बसस्थानक सुरू

अखेर राजापेठ बसस्थानक सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा : रवी राणांनी प्रवाशांना वाटले ताक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक राजापेठ येथे साकारण्यात आलेल्या नवनिर्मित छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकाहून बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर आ. रवी राणा यांनी प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्याच्या उद्देशाने प्रवाशांना थंड ताकाचे पाकीट वाटप केले.
बसफेºया सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी राणा हे बसस्थानकात गेले. आगार व्यवस्थापक अभय बिहुरे, सहायक वाहतूक अधीक्षक अरविंद पोटदुखे, वाहतूक अधीक्षक आशा वासनिक, नियंत्रक संजय देवरे यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सन्मान केले. यावेळी प्रथम बसफेरीचे चालक-वाहक सुनील इंगोले, बी.व्ही.मार्गनवार, सोपान राजगुरे, डी.आर. शर्मा, नरहरी जायभान, एस.बी. गायकवाड, डी.आर. टोपले, व्ही.डी.कडू, डी.एम. चेचरे, राजू नंदेश्वर, एस.एम. वानखडे यांचा गुलाबपुष्पाने सत्कार केले. यावेळी आ. राणांनी अधिकारी, कर्मचाºयांना थंड ताकदेखील वाटप केले.
बसस्थानकावरून अकोला, यवतमाळ, वाशीम मार्गावरून ये-जा करणाºया सामान्य, जलद, शिवशाही, अतिजलद बसफेºया नियमित सुटणार आहेत. यावेळी जयंत वानखडे, संजय हिंगासपुरे, जितू दुधाने, राजपाल वानखडे, अजय मोरय्या, शैलेंद्र कस्तुरे, राजेश वानखडे, संतोष कोलटके, प्रवीण सावळे, प्रशांत कावरेसह युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अशी आहे वाहतूक : अकोला, वाशीम व यवतमाळ मार्गावरील सर्व बसफेºया राजापेठ स्थानकातून सुटणार आहेत. तथापी, अमरावतीवरून पुढे जाणाºया फेºया मध्यवर्ती स्थानकावर जाईल. नागपूर दर्यापूर, परतवाडा आदी मार्गावर जाणाºया बसेस राजापेठवरून सुटून मध्यवर्ती स्थानकात जातील. अकोला, यवतमाळ, वाशीम मार्गाने पुढे जाणाºया बसेस राजापेठवरू न जातील, असे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.

Web Title: After all, Rajapeth bus station has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.