शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकराजने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कोटींचा फटका

By जितेंद्र दखने | Updated: July 27, 2024 11:00 IST

ग्रामपंचायती मालामाल : वित्त आयोगातून 'नो फंड'

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर प्रशासक राजवट असल्यामुळे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकारने गत तीन वर्षांपासून बंद केला आहे. या तीन वर्षांच्या कालावधीत छदामही न मिळाल्यामुळे अनेक विकासकामांना ब्रेक लागला आहे. ग्रामपंचायतींना मात्र पूर्वीप्रमाणे हा निधी दिला जात आहे. या निधीबाबत ग्रामपंचायती मालामाल, तर जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या तिजोरीत ठणठणाट झाला आहे.

जिल्हा परिषदेवर २० मार्च आणि १४ पैकी ११ पंचायत समित्यावर १३ मार्च २०२२ पासून प्रशासकराज आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांचा पंधराव्या वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकारने गत तीन वर्षांपासून बंद केला आहे. या तीन वर्षांत छदामही न मिळाल्यामुळे अनेक ग्रामविकासाच्या ब्रेक लागला आहे. ग्रामपंचायतींना मात्र पूर्वीप्रमाणे हा निधी दिला जात आहे. या निधीच्या बाबतीत ग्रामपंचायती बोलबाला आहे, तर जिल्हा परिषदा व पंचायत समित्या मात्र निधीबाबत डामडोल झाल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासकराज असलेल्या पंचायतराज संस्थांना वित्त आयोगाचा निधी दिली जाणार नसल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्राच्या भूमिकेमुळे अमरावती जिल्हा परिषद व जिल्ह्यातील ११ पंचायत समित्या निधीपासून वंचित आहे. यामुळे जिल्हा परिषदा व ११ पंचायत समित्यांचे मिळून जवळपास ५० कोटी रुपयांच्या निधीला मुकावे लागले आहे.

येत्या ३१ मार्च २०२५ ला संपणार मुदतकेंद्रीय वित्त आयोगाची दर पाच वर्षानी पुनर्रचना केली जाते. यानुसार दि. १ एप्रिल २०२० पासून देशात पंधरावा वित्त आयोग सुरू झाला आहे. या आयोगाची दि. ३१ मार्च २०२५ रोजी मुदत संपणार आहे.

झेडपीचे ५० कोटींचे नुकसानप्रशासकराज असल्यामुळे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १४ पैकी ११ पंचायत समित्यांना तीन वर्षांपासून १५वा वित्त आयोगाचा निधी बंद असल्याने जिल्हा परिषदेला जवळपास ५० कोटींचा फटका बसला आहे. प्रत्येक वर्षाला १८ ते २० कोटी येणे अपेक्षित होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतींना ३९९ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावती