शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या आंदोलनाने प्रशासन घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:35 IST

काँग्रेसच्या सोमवारच्या आंदोलनाने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला घाम फोडला. लोकहितासाठी नेहमीच आक्रमक होणाऱ्या तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर आणि धामणगाव रेल्वेचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाने शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाची धार वाढविली. कार्यकर्त्यांनीही पोलीस वाहनासमोर स्वत:ला झोकून देऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देनेत्यांचा एल्गार : शेतकऱ्यांच्या मुद्यावर आता माघार नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काँग्रेसच्या सोमवारच्या आंदोलनाने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला घाम फोडला. लोकहितासाठी नेहमीच आक्रमक होणाऱ्या तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर आणि धामणगाव रेल्वेचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाने शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाची धार वाढविली. कार्यकर्त्यांनीही पोलीस वाहनासमोर स्वत:ला झोकून देऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.काँग्रेसने २९ मे रोजी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला होता. तीन दिवसांच्या आत मागण्यांची पूर्तता न झाल्याने सोमवारचे आत्मदहन आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी या आंदोलनाचा चांगलाच धसका घेतल्याने सोमवारी सकाळी ९ वाजतापासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्व मार्गांची नाकेबंदी करण्यात आली; गनिमी काव्याचा अवलंब करून जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते आंदोलनस्थळी पोहोचलेच. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष बबलू देशमुख आदी नेतेही जिल्हा कचेरीसमोर धडकले. ११ च्या सुमारास भर उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. केंद्र व राज्य शासनाविरुद्धच्या घोषणांनी आसमंत निनादला.आमदार यशोमती ठाकूर यांच्या हाती असलेली बॉटल ज्वालाग्राही तरल पदार्थाची असल्याची शंका आल्यामुळे ती हिसकावून घेण्यासाठी पोलिसांनी शक्ती आणि युक्ती पणाला लावली.पोलीस-कार्यकर्त्यांत तुंबळ संघर्षयशोमती यांच्याभोवती महिला अधिकारी, इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कमांडोजनी गराडा घातला. बॉटल हिसकावण्याचा प्रयत्न सुरू झाला. यशोमतींनी विरोध केला. कार्यकर्तेही मग पोलिसांशी भिडले. तुंबळ संघर्ष झाला. अखेर यशोमतींना पोलीस वाहनात बसविले गेले. जीपमधून नेत असताना कार्यकर्ते वाहनावर चढले.सागर देशमुख आणि सागर कलाने या युवकांनी पोलीस वाहनासमोर स्वत:ला झोकून दिले. नारायण हिवसे हे वयस्क व्यक्ती यशोमती ठाकुरांना बसविलेल्या धावत्या जीपला लटकले. सुमारे ३०० मीटरपर्यंत ते धावत्या जीपला लटकले.दरम्यान काँग्रेसजणांच्या गर्दीतील मोहन सिंघवी, श्रीपाद पाल, श्रीराम नेहर यांनी अंगावर केरोसीन ओतून घेतल्याने पोलिसांची भंबेरी उडाली. डोक्याला दुपट्टा बांधून आंदोलकांमध्ये मिसळलेल्या पोलीस हेरांनी वेळीच कोरोसीनच्या बाटल्या हिसकावून घेतल्या. अनर्थ टाळला. सुमारे दीडशे पोलिसांच्या फौजेची काँग्रेस नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेपुढे आणि गनिमिकाव्यापुढे दमछाक झाली. अथक प्रयत्नांनंतर आंदोलकांना वसंत हॉलमध्ये हलविण्यात पोलिसांना यश आले.आंदोलनात सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, प्रकाश साबळे, श्याम देशमुख, प्रवीण वाघमारे, रूपराव वानखडे, श्रीराम नेहर, दयाराम काळे, प्रकाश काळबांडे, संजय मार्डीकर, भागवत खांडे, बिट्टू मंगरोळे, बापूराव गायकवाड, मोहन सिंगवी, हरिभाऊ मोहोड, प्रमोद दाळू, सुरेश आडे, प्रवीण वाघमारे, शिवाजी बंड, सुरेश साबळे, राहुल येवले, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, अनंत साबळे, गजानन राठोड, प्रदीप देशमुख, रावसाहेब लंगोटे, भैयासाहेब मेटकर, सुभाष पाथरे, प्रकाश रिठे, वैभव वानखडे, मुकद्दर खॉ पठाण, श्रीपाल पाल, अभिजित देवके, अलका देशमुख, वैशाली ठाकरे, बाळासाहेब लांडे, विनोद गुळदे, सतीश धांडे, देवेंद्र दंदे, राजेश काळे,विनोद चौधरी, बाळासाहेब इंगळे, सिद्धार्थ बोबडे, पारस चौधरी, सागर देशमुख, अनिकेत देशमुख, बाळासाहेब देशमुख, प्रशांत शेळके, प्रदीप देशमुख, प्रदीप वाघ, रमेश ठाकरे, आशिष महल्ले, विलास बनसोड, श्याम इंदोरे, मंगेश धावडे, सर्फराज भाई, मकेश्र्वर, श्रीधर काळे, अ.कलीम अ.रऊफ, वीरेंद्रसिंह जाधव, प्रशांत भुयार, गणेश कडू, बबलू बोबडे, प्रफुल्ल राऊत आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.पोलिसांचे प्रभावी नियोजनकाँग्रेसची आक्रमकता अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने पोलिसांची दमछाक झाली. हे खरे असले असले तरी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त चिन्मय पंडित आणि उपायुक्त शशिकांत सातव यांनी सांभाळलेली धुरा प्रभावी होती. पोलिसांच्या नियोजनबद्ध कार्यप्रणालीमुळे अत्यंत आक्रमक आंदोलन चिघळले नाही. शत्रुत्वाची भावना न राखता पोलिसांनी पार पाडलेले कर्तव्य ही पोलिसी कार्यशैलीची खासियत ठरली. सहायक पोलीस आयुक्त रणजित देसाई, यशुदास बोरडे, सुनील सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, किशोर सूर्यवंशी, अर्जुन ठोसरे, निलिमा आरज, दिलीप पाटील, मनीष ठाकरे, प्रकाश अकोटकर, शरद कुळकर्णी, पोलीस उपनिरीक्षक वैशाली आठवले, शीतल निमजे, सुजाता बन्सोड आणि तैनात इतर पोलिसांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.रस्त्यावर तूर टाकून शासनाचा लक्षवेधशासनाने अर्धवट खरेदी केल्यामुळे ३७ हजार शेतकऱ्यांची किमान चार लाख क्विंटल तूर घरी पडून आहे. आता व्यापारी बेभाव खरेदी करीत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी तूर रस्त्यावर फेकत शासन धोरणाचा निषेध केला. कचेरीसमोरच्या मुख्य चौकात तूर फेकण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला; तथापि यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख यांनी तूर फेकलीच.या आहेत मागण्याशेतमालास हमी भाव द्या. तुरीचे चुकारे त्वरित द्या. जिल्ह्यातील सर्वच १२ ही तूर व हरभरा खरेदी केंदे्र बंद सुरू करा. खरिपासाठी त्वरित कर्जपुरवठा करा. बोंडअळीची नुकसानभरपाई त्वरित द्या. शासन मदतीमधून बँकांची कर्जकपात बंद करा. पेट्रोल व डिझेलची जीवघेणी दरवाढ मागे घ्या. महागाई कमी करा. शेतमालासाठी तात्पुरत्या स्वरूपात गोदाम उपलब्ध करा. शेतमालावर शेतकऱ्यांना तारण कर्ज द्या.सरकार थापाडेकेंद्र व राज्यातील भाजप सरकारने चार वर्षात घोषणाबाजीशिवाय काहीच केले नाही. शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली; मात्र प्रत्यक्षात फायदा नाही. तुरीचे चुकारे नाहीत. चार लाख क्विंटल तूर शेतकºयांच्या घरी पडून असताना खरेदी केंदे्र बंद केली. या सरकारला आता वठणीवर आणण्यासाठी आक्रमक आंदोलनाचा निर्णय घेतला.- यशोमती ठाकूर, आमदार तथा सचिव, राष्ट्रीय काँगे्रससरकारचे दिवस भरलेभाजप सरकारने चार वर्षांपासून शेतकºयांची फसवणूकच केली. शेतकºयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ नाही. शेतमाल पूर्णपणे खरेदी केला नसताना तूर व हरभरा खरेदी केंद्रे बंद केली. चुकारेही दिले नाहीत. शेतकरी मरत असताना झोपेचे सोंग घेणाºया या सरकारचे दिवस भरलेत.- वीरेंद्र जगतापआमदार, धामणगाव रेल्वेसंघर्ष सुरूच राहणारदेशात व राज्यात काँग्रेसची सत्ता असताना शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेला न्याय दिला. मात्र, चार वर्षांपासूण भाजपा सरकार सर्वसामान्यांसह शेतकºयांवर अन्याय करीत असल्याने याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्षाने आता रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. जोवर न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्र्ष सुरूच राहणार- बबलू देशमुख,अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस