शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

चंद्रभागा प्रकल्पग्रस्तांसमोर प्रशासन नमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:37 IST

चंद्रभागा लघुबॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश आले असून, शेतजमिनीचा मोबदला व इतर मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे लेखी पत्र एसडीओ व्यंकट राठोड यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्दे१० दिवस अन्नत्याग : दोन दिवस रास्ता रोको केल्यानंतर मिळाला न्याय

आॅनलाईन लोकमतआसेगाव पूर्णा : चंद्रभागा लघुबॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश आले असून, शेतजमिनीचा मोबदला व इतर मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे लेखी पत्र एसडीओ व्यंकट राठोड यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनात पहिल्याच दिवशी निवेदनात २८ फेब्रुवारीला विष घेण्याचा अल्टिमेटम दिला असला तरी थेट २७ फेब्रुवारी रोजी एसडीओ व्यंकट राठोड यांनी मंडपात येऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. २८ फेब्रुवारी रोजी १२ वाजता आंदोलक ठरल्याप्रमाणे धरणावर विषाच्या बाटल्या घेऊन पोलिसांना चकमा देऊन निघाले असता, त्यांच्यावर तेथे दोनदा मधमाशांनी हल्ला चढविला. त्या हल्ल्यात सात आंदोलकांना दर्यापूर येथील उपरुग्णालयात उपचारासाठी हलविण्यातसुद्धा आले होते.आंदोलकांनी अखेर दर्यापूर-आसेगाव मार्गावर महिमापूर फाट्याजवळ आंदोलन मोर्चा वळविला. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजतापासून रास्ता रोको सुरू केले. या आंदोलनात ३०० ते ४०० प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी सहभाग नोंदविला. प्रकल्पग्रस्तांनी होळीसुद्धा दर्यापूर-आसेगाव मार्गावरच साजरी केली. आंदोलनस्थळी आ. रवि राणा व त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी भेट दिली. ग्रा.पं. गावनमुना ८ (अ) नुसार निवडा करून मोबदला तसेच इतर मागण्या मार्गी लावू, असे एसडीओंनी लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचे समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण म्हणाले.