शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीची फेलोशिप लालफितशाहीत अडकली

By गणेश वासनिक | Updated: December 11, 2022 17:39 IST

पी.एचडी करीत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपची फाईल मंत्र्यालयात गत आठ महिन्यांपासून लालफितशाहीमध्ये अडकली आहे.

अमरावती :

पी.एचडी करीत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपची फाईल मंत्र्यालयात गत आठ महिन्यांपासून लालफितशाहीमध्ये अडकली आहे. राज्य शासनाला वारंवार स्मरणपत्र, निवेदने देऊनही फेलोशिपबाबत सकारात्मक मार्ग निघालेला नाही. फेलोशिप फाईलच्या आदिवासी मंत्रालयात घिरट्या थांबवून संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी ट्रायबल फोरमने आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना निवेदनाद्वारे केली आहे.

संशोधन अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी ८५ कोटी ९ लक्ष १७ हजारांच्या अभिछात्रवृतीचा प्रस्ताव तयार करुन १७ मार्च २०२२ रोजी शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतरही तो प्रस्ताव मंजूर होत नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे समोर २८ मार्च २०२२ ते ४ एप्रिल २०२२ पर्यंत पहिले आंदोलन केले होते. त्यानंतर २ मे २०२२ ते १४ मे २०२२ या दरम्यान रखरखत्या उन्हात दुसरे आंदोलन केले. तरीही मार्ग निघाला नाही. कंटाळून १५ नोव्हेंबरला नाशिकच्या जनजाती गौरव दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना फलक दाखवून फेलोशिपची मागणी केली. मात्र, आश्वासनाच्या पलिकडे संशोधक विद्यार्थ्यांच्या हातात काही पडले नाही.

संशोधक विद्यार्थ्यांना अनुसूचित जमाती अभिछात्रवृत्तीचा लाभ मिळत नाही. त्यांना बऱ्याच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आणि बरेचदा काही विद्यार्थी संशोधन प्रकल्प अर्ध्यावर सोडून देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप सुरू केली.  छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे यांनी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती सुरू केली. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेनेही अभिछात्रवृत्ती सुरू केली आहे. मात्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही या सगळ्या संस्थांपेक्षा सर्वात जुनी तसेच भारतीय संविधानकृत आणि स्वायत्त संस्था असतानाही या संस्थेने संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशिपसाठी आंदोलने होत असताना अद्यापर्यंत फेलोशिपची फाईल निकाली काढलेली नाही. त्यामुळे आदिवासी समाजात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे आणि आदिवासी विकास विभागाच्या कार्यप्रणालीवर संताप उसळलेला आहे.तर १९ डिसेंबपासून नागपूरात बेमुदत उपोषणनागपूर येथे विधीमंडळाचे १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. पीएचडी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभाग फेलोशिप देण्यासाठी कुचराई करीत आहे. त्यामुळे संशोधक विद्यार्थी १९ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात बेमुदत उपोषण करतील, अशी माहिती आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष बबलू गायकवाड यांनी दिली.आदिवासी समाजात आधीच पराकोटीचे दारिद्रय आणि निरक्षरता आहे. त्यातही पीएचडी करणारे बोटावर मोजण्याएवढेच आहेत. या विद्यार्थ्यांनी पैशाअभावी संशोधन सोडू नये. त्यांना अर्थसाहाय्य म्हणून फेलोशिप मिळावी, यासाठी ट्रायबल फोरम सातत्याने प्रयत्न करीत आहे. आदिवासी विकास मंत्र्यांना भेटून, कैफियत मांडून निवेदन दिले आहे.- रितेश परचाके, विभागीय अध्यक्ष, ट्रायबल फोरम, अमरावती