शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

धारणी प्रकल्पातील २७ आश्रमशाळा वा-यावर, आदिवासी समिती दौ-यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 16:41 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (धारणी) अंतर्गत येणा-या जिल्ह्यातील २७ अनुदानित आश्रमशाळांना विविध योजनांमधून प्राप्त होणारे अनुदान दोन वर्षांपासून थकले आहेत.

अमरावती - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (धारणी) अंतर्गत येणा-या जिल्ह्यातील २७ अनुदानित आश्रमशाळांना विविध योजनांमधून प्राप्त होणारे अनुदान दोन वर्षांपासून थकले आहेत. जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा खेळखंडोबा चालविल्याचा या अनुषंगाने आरोप होत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत शासकीय आणि अनुदानित अशा दोन प्रकारच्या जवळपास ५२ आश्रमशाळा संचालित होतात. दोन्ही ठिकाणी नियम सारखे असले तरी शासकीय आश्रमशाळा ओस पडल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांकरिता आलेले लाखोंचे साहित्य विकले जात आहे. अनेकदा गावकºयांनी हा चोरी वजा अपहार पकडून दिला आहे. दुसरीकडे अनुदानित आदिवासी आश्रमशाळांवर जाचक अटी लादून अनुदानास विलंब लावण्याचा प्रकार सुरू आहे. सर्व सुविधा पुरविण्यात येऊनसुद्धा दोन-दोन वर्षे अनुदान या-ना त्या कारणाने अडकविण्यात आले. परिणामी संस्थाचालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. आश्रमशाळांतील  ३० हजारांवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी अशाप्रकारे खेळ करण्यात येत आहे. आदिवासी विकासाचा निधी गेला कुठे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. ज्याने तक्रार केली, त्याला अनुदान मिळण्याऐवजी नाहक त्रास देण्याचा प्रकार सुरूआहे, अशी माहिती येथील एका आश्रमशाळा संचालकाने दिली आहे.१ ते ३ नोव्हेंबर २०१७ पर्यंत महाराष्ट्र शासनाची आदिवासी कल्याण समिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (धारणी) अंतर्गत आश्रमशाळांची तपासणी करणार आहे. हा दौरा निश्चित झाला असून, आदिवासी विकास विभागाकडून अनुदान वितरणासंबंधी कोणतीही कार्यवाही केली जात नाही.

शाळांना अनुदानच दिले गेले नसल्यामुळे अनेक आश्रमशाळांमध्ये सोई-सुविधांचा अभाव आहे. आश्रमशाळांना प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाºयांच्या अनेक भेटी या सत्रात झाल्या असल्या तरी अद्यापही अनुदानाचे धनादेश मिळाले नाहीत. त्यामुळे विभागाविषयी अनास्था निर्माण झाली आहे.

टॅग्स :Schoolशाळा