शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या आस्थापना खर्चात ‘आयएफएस’मुळे अतिरिक्त वाढ

By गणेश वासनिक | Updated: July 4, 2024 18:57 IST

राज्य शासन अंधारात; अनावश्यक पदनिर्मितीने पदस्थापनेचे नियोजन कोलमडले, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार लक्ष देणार केव्हा?

गणेश वासनिक / अमरावती अमरावती : राज्याच्या वनविभागामध्ये गरज नसताना देखील भावसे संवर्गात अनावश्यक पदे वाढविण्यात आली आहेत. ‘आयएफएस’च्या मनमानी कारभारामुळे आता शासनाच्या तिजोरीवर व आस्थापना खर्चात ‘भावसे’मुळे अतिरिक्त वाढ झाली आहे. पदांचा दुरुपयोग करून मर्जीनुसार व काही आधिकाऱ्यांसाठी ‘आयएफएस’ची अनावश्यक पदनिर्मिती केल्याने नियोजन कोलमडले आहे. या नियमबाह्य कारभाराकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.

आस्थापनेवरील खर्च कमी करावा, याबाबत राज्य शासन प्रयत्नशील असते. मात्र, वनविभागात उलट प्रक्रिया घडत आहे. काही वरिष्ठ भावसे अधिकाऱ्यांनी आवश्यकता नसतानाही भावसेची अतिरिक्त पदे वाढवून घेतली. बऱ्याच भावसे अधिकाऱ्यांना २ वर्षे इतकाच कालखंड झाला असतानाही अजूनही त्यांना पदस्थापना करण्यात आलेली नाही. मात्र, राज्य शासनावरील आस्थापना खर्चात वाढ झालेली आहे. या चुकीच्या व्यवस्थापनामुळे की जाणूनबुजून केलेल्या चुकीमुळे केंद्र सरकारकडे (यूपीएससी) भावसेची जास्तीच्या पदांची मागणी करण्यात आली. मात्र, ही झालेली चूक राज्य शासनाला कळवू दिली नाही आणि याचा तोटा राज्य शासनाला आर्थिकदृष्टया झाला. मात्र, याचाच प्रत्यक्ष, अप्रत्यपणे परिणाम राज्य सेवेतील अधिकाऱ्यांना भोगावा लागत आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक भावसे पदे असल्याने विभागीय स्तरावर मवसे अधिकाऱ्यांना पदस्थापना कधी होऊच दिली नाही, हे वास्तव आहे.

राज्य शासन अंधारात; अनावश्यक पदनिर्मितीवनविभागामध्ये आवश्यकता नसताना अनेक ‘पीसीसीएफ’, ‘एपीसीसीएफ’ची पदे विनाकारण निर्माण करण्यात आली आहेत. त्यांचा वेतन खर्चाचा भुर्दंड राज्य शासन विनाकारण सोसत आहे. याकडेसुद्धा वनमंत्रालय लक्ष देईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ‘आयएफएस’ लॉबीने आपल्या भल्यासाठी पदांची निर्मिती केली असून विभागीय वनअधिकाऱ्यांना ना पदस्थापना, ना हक्क मिळतो, अशी आर्त हाक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे प्रस्तावाद्वारे महाराष्ट्र राज्य राजपत्रित वनअधिकारी संघटनेचे अध्यक्ष अमोल थोरात, मुख्य प्रवर्तक सुभाष डोंगरे, कार्यकारी अध्यक्ष अतुल देवकर, महासचिव आदींनी केली आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती