शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'एसटी'ला विठुराया पावला, तिजोरीत एक कोटीची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 11:23 IST

पंढरपूर यात्रा : दहा दिवसांत मिळाले भरघोस उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाने यंदा आषाढी एकादशीनिमित्त २१३ विशेष बसेस पंढरपूर यात्रेसाठी सोडल्या होत्या. यातून १ कोटी ११ लाख ७४ हजार ९६२ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने लालपरीला विठ्ठल पावला आहे. आषाढीसाठी जिल्ह्यातील आठ आगारांमधून ४१७ फेऱ्या झाल्या आहेत. एसटीने ४९ लाख ९३ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. तर ३७ हजार ७०४ भाविकांनी यंदाच्या वर्षी प्रवास केला असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्याही गावातून ४० प्रवासी मिळाल्यास त्या गावातून थेट बस पाठविण्याचे नियोजनही महामंडळाने केले होते. यामुळे अनेक प्रवाशांना पंढरपूरला जाण्याला सोयीचे झाले. एसटी महामंडळाने १३ ते २२ जुलै दरम्यान जादा बसेस सोडल्याने भाविकांना लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपले घर गाठता आले. यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आषाढी यात्रेमध्ये पंढरपूर येथे दाखल होतात. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या आठ बसस्थानकांतून जादा गाड्या सोडल्या होत्या.

महिला व ज्येष्ठांना प्रवास सवलतजिल्ह्यातून पंढरपूर यात्रेकरिता पंढरपूर, पुणे, आळंदी आदी ठिकाणी अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या. महिला, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ व ७५ वर्षावरील नागरिकांना ६५.९६ लाख रुपयांची सवलत योजने अंतर्गत एसटी महामंडळामार्फत देण्यात आली.

आकडे बोलतातएकूण फेऱ्या : ४१७एकूण किलोमीटर : ४९.९३ लाख एकूण उत्पन्न : १ कोटी ११ लाख ७४ हजार ९६२ रुपये एकूण प्रवासी : ३७,७०४

३७ लाखांची उत्पन्नवाढयंदा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी एसटी बसेस सोडल्या होत्या. मागील वर्षी यात्रा महोत्सवात ७८.९२ लाखांचे उत्पन्न महामंडळाला झाले होते. यंदा १ कोटी १७ लाखांवर उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३७ लाखांचे उत्पन्न वाढले. यंदा प्रवासी संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी योगेश ठाकरे यांनी दिली. 

टॅग्स :Amravatiअमरावती