शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अभिनेत्री कंगना यांच्या कार्यालयाचे बांधकाम पाडण्याची कारवाई सूडबुद्धीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 5:38 PM

कंगना राणावत यांनी जे वक्तव्य केले त्याचा सूड उगविण्यासाठी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे.

ठळक मुद्देराज्यसभा खासदार संजय राऊत यांचे कंगनाबद्दलचे वक्तव्य म्हणजे समस्त महिलांचा अपमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: आज मुंबई महानगर पालिकेच्या पथकाने अभिनेत्री कंगना राणावत यांचे कार्यालय अनधिकृत म्हणून पाडले. अनेक वर्षांनंतर मनपाने ही कारवाई केली. कंगना राणावत यांनी जे वक्तव्य केले त्याचा सूड उगविण्यासाठी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे. कंगनाने वक्तव्य केले त्याविरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, संजय राऊत यांनी एका महिलेबद्दल अभद्र शब्दप्रयोग केला आहे, हा संपूर्ण महिला वर्गाचा अपमान आहे व याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर बसून कारभार चालवू नये.पूर्व विदर्भात भयानक पूरपरिस्थिती आहे. भंडारा-गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्याचे पीक उध्वस्त झाले आहे. बेरोजगार तरुण तरुणी रोजगारासाठी भटकत आहेत. एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत. कोरोना महामारीमुळे जनता त्रस्त आहे. सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हॉस्पिटल मध्ये जागा नाही,आॅक्सिजन सिलेंडर नाहीत, मृत्यू वाढत आहेत या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मातोश्री निवासस्थानी आराम करीत आहेत व त्यांचे खासदार संजय राऊत हे खुलेआम महिलांचा अपमान करीत आहेत. मुख्यमंत्री निमूटपणे हा प्रकार बघून त्यांना पाठीशी घालत आहेत. हे सर्व अतिशय निंदाजनक असून जनतेच्या भावनांचा अपमान करणारे आहे.

मुख्यमंत्र्यांचे या वक्तव्याला समर्थन असल्यास त्यांनी तसे जाहीर करावे किंवा समर्थन नसल्यास मुख्यमंत्री महोदयांनी संजय राऊत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. सोबतच मुखमंत्र्यांनी राज्याचा प्रमुख म्हणून आपले कर्तव्य प्रत्यक्ष मैदानात उतरून पार पाडावे असा सल्ला सुद्धा खासदार राणा यांनी दिला आहे. विदर्भातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची पिके वाहून गेली,घरेदारे पडली, गुरेढोरे वाहून गेली या सर्वांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही खासदार राणा यांनी केली आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतnavneet kaur ranaनवनीत कौर राणा