शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘माइंड लॉजिक्स’ला अमरावती विद्यापीठाचा पुन्हा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 19:43 IST

उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून ‘माइंड लॉजिक्स’कडे असलेली डिजिटल मूल्यांकनाची अधिकांश कामे काढून घेण्यात आली आहेत. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ठाण मांडून बसलेल्या ‘माइंड लॉजिक्स’ कंपनीचे पंख छाटण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. यावर्षी उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून ‘माइंड लॉजिक्स’कडे असलेली डिजिटल मूल्यांकनाची अधिकांश कामे काढून घेण्यात आली आहेत. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. 

विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा प्रणालीच्या नियमनाची जबाबदारी असलेल्या ‘माइंड लॉजिक्स’ या कंपनीने विद्यापीठाच्या तिजोरीला मोठे भगदाड पाडले. मोठ्या प्रती पेपर आणि प्रती परीक्षा या घोळातून कंपनीने चांगलीच रक्कम प्राप्त केली. विद्यार्थी संघटना, प्रसार माध्यमे आणि सिनेट सभेने या विषयावर सातत्याने लक्ष वेधल्यानंतर अखेरीस कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी या कंपनीकडून परीक्षेची कामे टप्प्याटप्प्याने काढून घेण्याचे सिनेट सभेत जाहीर केले होते. त्यानुसार मागील परीक्षेपासून प्री आणि पोस्ट परीक्षेची कामे कंपनीकडून अगोदरच काढून घेण्यात आलेली आहेत. त्यानंतर कंपनीकडे ऑनलाइन प्रश्नपत्रिका वितरण आणि डिजिटल व्हॅल्यूएशनची कामे शिल्लक होती. आता उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून कंपनीकडून विज्ञान, विधी आणि फार्मसी या शाखांच्या परीक्षांचे डिजिटल व्हॅल्यूएशनची कामे काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता या तीनही परीक्षांसाठी जुन्या प्रकारच्या उत्तरपत्रिका वापरल्या जाणार असून, मूल्यांकन ऑफलाइन होणार आहे. परीक्षा संचालक हेमंत देशमुख यांनी माइंड लॉजिक्सला दणका देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

वर्षाकाठी ७० लाखांची बचत डिजिटल व्हॅल्युएशनसाठी प्रत्येक उत्तरपत्रिकेमागे २२ रुपये दर ‘माइंड लॉजिक्स’ आकारत होते. यामध्ये या तीनही शाखांच्या तीन लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन होते. त्यामुळे आता ७० लाखांच्या आसपास रक्कम वाचणार आहे, शिवाय परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत ‘माइंड लॉजिक्स’ कडून होणारी दिरंगाईदेखील कमी होणार आहे.

विद्यापीठाच्या हितासाठी उचलले पाऊलकुलगुरूंनी माइंड लॉजिक्सची गच्छंती करण्याचे आश्वासित केले. त्यानुसार आम्ही हे पाऊल उचलले आहे. यामुळे डिजिटल मूल्यांकनासाठी लागणारी रक्कमदेखील वाचणार आहे. पुढील परीक्षेपासून कंपनीकडून पूर्ण कामे काढून घेतली जातील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठexamपरीक्षाdigitalडिजिटल