शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
6
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
7
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
8
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
9
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
10
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
11
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
12
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
13
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
14
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
15
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
16
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
17
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
18
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
19
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
20
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

तर तत्कालीन आयुक्तांवरही कारवाई

By admin | Updated: July 9, 2015 00:18 IST

मालमत्ता कर वसुलीची मोहिम तत्कालीन आयुक्तांनी गत चार वर्षांपासून राबविली नसेल तर त्यांच्या विरुद्ध ...

आयुक्तांची स्पष्टोक्ती : पठाणी कर वसुलीला विरोधी पक्षनेत्यांचा विरोधअमरावती: मालमत्ता कर वसुलीची मोहिम तत्कालीन आयुक्तांनी गत चार वर्षांपासून राबविली नसेल तर त्यांच्या विरुद्ध सभागृहात कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यास निश्चितपणे कारवाई करणार, अशी स्पष्टोक्ती महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केली. युद्धस्तरावर सुरु झालेल्या सहापट मालमत्ता कर वसुलीला विरोधी पक्षनेत्यांनी कडाडून विरोध केला, हे विशेष.आयुक्त गुडेवार यांनी महापालिका उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता कर वसुलीला लक्ष्य केले आहे. तांत्रीक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमार्फत सर्वेक्षण करुन ज्यांनी विनापरवानगीने बांधकाम करुन घर बांधले अशा मालमत्ता धारकांना सहा वर्षांचे कर आकारले जात आहे. प्रशासनाकडून सहा पट कर वसुलीच्या नोटीस नागरिकांना बजावल्या जात आहेत. त्यामुळे नागरिक हे नगरसेवकांकडे धाव घेवून कैफियत मांडत आहे. मात्र सहापट मालमत्ता कर आकारणीच्या भूमिकेवर आयुक्त ठाम आहेत. परिणामी आयुक्त विरुद्ध नगरसेवक अशी लढाई उभी राहण्याची दाट शक्यता आहे. याच श्रृंखलेत मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाची बैठक आटोपताच शिवसेनेचे विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर यांनी आयुक्त गुडेवार यांना निवेदन सादर करुन इंग्रजाप्रमाणे सुरु असलेली मालमत्ता कराची पठाणी वसुली थांबविण्याची मागणी करण्यात आली. परंतु ही कर वसुली मोहिम रोखता येणार नाही. ती थांबवायची असेल तर सभागृहात कायदा मंजूर करावा लागेल. त्यानंतरच ती थांबेल, अशी ठाम भूमिका आयुक्तांनी घेत विरोधी पक्षनेता हरमकर यांना उत्तर दिले. तेंव्हा सहापट कर वसुलीचा भार नागरिकांनी का सहन करावा? यापूर्वीच्या आयुक्तांनी कर मुल्यांकन का केले नाही. चूक प्रशासनाची असताना नागरिकांनी आता भुर्दंड का सहन करायचा, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती हरमकर यांनी आयुक्तांवर केली. या प्रकरणी लहान कर्मचाऱ्यावर कारवाई करुन तुम्हाला काय साध्य करायचे आहे, हे देखील हरमकर म्हणाले. यापूर्वीच्या आयुक्तांची मालमत्तांचे मुल्यांकन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई का करीत नाही? असा सवाल आयुक्तांच्या पुढ्यात विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर यांनी ठेवला. दरम्यान आयुक्त म्हणाले, तत्कालीन आयुक्तांवर कारवाई करतो. मात्र, त्याकरीता सभागृहाने तत्कालीन आयुक्तांवर कारवाई करण्याचा ठराव मंजूर आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर वसुली थांबवितो, त्यासाठी कायदा बदलविण्याबाबत सभागृहात ठराव मंजूर करुन तो शासनाच्या निर्णयासाठी पाठविण्याचे आयुक्तांनी सांगितले.कर मूल्यांकन केले नाही, याला नागरिक दोषी नाहीत. त्यामुळे आता सहापट रक्कम नागरिकांनी का भरावी, हा माझा सवाल आहे. चूक प्रशासनाची तर शिक्षा नागरिकांनी का भोगावी. सहापट नव्हे तर दुप्पट्ट कर वसूल व्हावा.प्रवीण हरमकरविरोधी पक्षनेता, महापालिका