शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना विश्वासात न घेताच विद्यापीठासाठी जमिनींचे अधिग्रहण, उपोषणाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 18:32 IST

आरमोरी मार्गावर असलेल्या गोगाव येथील २०० एकर जमीन विद्यापीठासाठी अधिग्रहीत करण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र ज्या शेतक-यांची जमीन अधिग्रहित केली जात आहे त्यांना याबाबत काहीच कळविण्यात आलेले नाही.

गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गोगाव येथील २०० एकर जमीन विद्यापीठासाठी अधिग्रहीत करण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र ज्या शेतक-यांची जमीन अधिग्रहित केली जात आहे त्यांना याबाबत काहीच कळविण्यात आलेले नाही. ९५ टक्के शेतक-यांचा जमीन देण्यास विरोध आहे. तरीही जमीन मोजमापाची कार्यवाही सुरू केली असल्याने शेतक-यांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे. काही शेतक-यांनी यासंदर्भात उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.

गोंडवाना विद्यापीठाला एकूण २०० एकर जमिनीची आवश्यकता आहे. सर्वप्रथम चामोर्शी मार्गावरील वनविभागाची जागा त्यासाठी निश्चित केली होती. मात्र वनविभागाने सुमारे २०० एकर जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यापीठाने आपला मोर्चा आरमोरी मार्गाकडे वळवित गडचिरोलीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगाव, अडपल्ली या दोन गावाजवळची जमीन निश्चित केली आहे. यामध्ये जवळपास १५० शेतक-यांची जमीन जाणार आहे. यातील बहूतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. विद्यापीठाला जमीन दिल्यास शेकडो शेतकरी भूमिहीन होणार असल्याने ९९ टक्के शेतकरी विद्यापीठाला जमीन देण्यास स्पष्ट नकार दर्शवित आहेत. 

जमीन अधिग्रहन हा अत्यंत संवेदशील मुद्दा आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक शेतक-याला विश्वासात घेऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक असताना काही निवडक शेतक-यांची सहमती घेवून जमीन अधिग्रहणाची कार्यवाही सुरू केली आहे. ९ फेब्रुवारीपासून सिमांकनही निश्चित केले जात आहे. आपल्याला विश्वासात न घेताच प्रशासन जबरदस्तीने जमीन ताब्यात घेत असल्याने याविरोधात काही शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रेल्वे पाठोपाठ विद्यापीठाच्या जागेचा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

याबाबत विद्यापीठातील वरिष्ठ अधिका-यांना शेतक-यांनी विचारणा केली असता जमीन अधिग्रहण ही आपली जबाबदारी नसून जिल्हाधिका-यांशी संपर्क साधा, असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.  ''जमीन मोजमाप करणे हे भूमी अभिलेख विभागाचे काम आहे. त्याचा विद्यापीठाशी संबंध नाही. मोजमाप झाल्यानंतर शेतक-यांची सहमती मागीतली जाईल. त्यानंतरच जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण केली जाईल''. - दीपक जुनघरे, प्रभारी कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

टॅग्स :Farmerशेतकरी