शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

एसीपी बचाटे, एलसीबी प्रमुखांना ‘डीजी इन सिग्निया’

By प्रदीप भाकरे | Updated: April 26, 2024 16:36 IST

१८ अधिकारी अंमलदारांना सन्मानचिन्ह : पोलीस महासंचालकांकडून शिक्कामोर्तब

अमरावती: राज्यभरातील खाकीतील ८०० अधिकारी तथा अंमलदारांना पोलिस दलात उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेबद्दल 'डीजी इनसिग्निया' अर्थात पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २५ एप्रिल रोजी त्याबाबतचे आदेश पारित केलेत. त्यात अमरावती शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे एसीपी शिवाजीराव बचाटे, एलसीबीचे पीआय किरण वानखडे, अमरावती ग्रामीणमधून नुकतेच बदलीवर गेलेले पीआय हेमंत ठाकरे यांच्यासह अमरावती शहर, ग्रामीण व एसआरपीएफ दलातील एकूण १८ अधिकारी, अंमलदारांना मानाचे 'डीजी इनसिग्निया' पदक जाहीर झाले आहे.

             अमरावती एसआरपीएफमधील पोलीस उपनिरिक्षक आर. एस. हेगाडे व के. एच. नागपुरे, अमरावती शहरमधील सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय गुरमाळे व अशोक पिंपळकर, ग्रामीण पोलिस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद किटे आणि राजेश काळकर यांना पदक जाहीर झाले आहे. शहर आयुक्तालयातील हेड कॉन्स्टेबल नरेंद्र भुरंगे, अयुब खान सैदूर रहमान खान, चंद्रकांत जनबंधू, प्रवीण बुंदेले, नितीन आखरे, नंदकिशोर अंबुलकर, अशोक वाटाणे, मनीष गहाणकर आणि पोलिस शिपाई अभय वाघ यांचा समावेश आहे. डीजी इनसिग्निया पदक प्राप्त पोलिस अधिकारी, अंमलदार यांना या पदकाचे वितरण १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा स्टेडियमवर होणाऱ्या मुख्य शासकीय सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाते.

बचाटे कर्तव्यनिष्ट अधिकारीपोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहिर झालेले शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांनी अमरावती शहरात कोतवाली, बडनेरा येथे ठाणेदार म्हणून उत्तम काम केले आहे. येथे कार्यरत असतानाच त्यांना एसीपी म्हणून पदोन्नती मिळाली. क्राईम एसीपी म्हणून देखील त्यांनी अमिट छाप सोडली आहे. तर दुसरीकडे, अमरावती ग्रामीणचा पंचप्राण असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेची धुरा यशस्वीरित्या सांभाळणारे पोलीस निरिक्षक किरण वानखडे हे देखील कर्तव्यनिष्ट अधिकारी म्हणून ओळखले जातात.

 

टॅग्स :GovernmentसरकारAmravatiअमरावती