शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी आघाडी स्थापन करणाऱ्या बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का; अचलपूरमधील गड कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 13:29 IST

achalpur Assembly Election 2024 Result Live Updates : तिसरी आघाडी स्थापन करणाऱ्या संघटनेतील पहिला पराभवाचा धक्का प्रहार संघटनेला बसला आहे.

kopargaon Assembly Election 2024 Result Live Updates : राज्यातील २८८ विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येत आहेत. सुरुवातीचे कल पाहता महायुतीला राज्यात मोठं यश मिळताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, तिसरी आघाडी उघडलेल्या बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून लढत होते. 

बच्चू कडू यांनी संभाजी छत्रपती आणि राजू शेट्टी यांच्याशी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीने आपले उमेदवारही दिले आहेत. त्यामुळे या आघाडीचा काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी महायुती अचलपूर विधानसभेसाठी प्रवीण वसंतराव तायडे यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीतील अनिरुधा ऊर्फ बाबलुभाऊ सुभनराव देशमुख यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालात अचलपूरची जागा PHJSPचे बच्चू बाबाराव कडू यांनी जिंकली होती.

बच्चू कडू यांनी १९९९ साली विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. त्यावेळी त्यांचा १३०० मतांनी पराभव झाला होता. त्यांच्या पहिल्या निवडणुकीवेळी त्यांच्या अनेक मित्रांनी घरातील दागिने मोडले. पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले आणि निधी उभा केला होता.

आमदार झाल्यानंतर बच्चू कडू यांनी ‘प्रहार जनशक्ती पक्षा’ या संघटनेची स्थापना केली. अपंग, शेतकरी आणि गरिबांच्या न्याय हक्कासाठी झगडणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे. अपंगांच्या प्रत्येक प्रश्नावर ते अधिक आक्रमक होतात. अगदी अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत ते आक्रमक होऊन जातात.

विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट  अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Bacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती