शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

अचलपूर, सरमसपुरा ठाणेदारांची उचलबांगडी

By admin | Updated: August 17, 2015 00:02 IST

स्वातंत्र्यदिनी अचलपूर-परतवाड्यातील दोन ठाणेदारांसह जिल्ह्यातील पाच ठाणेदारांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या.

अमित बटाऊवाले हत्याकांड : आणखी दोन आरोपींना अटक अमरावती/ अचलपूर : स्वातंत्र्यदिनी अचलपूर-परतवाड्यातील दोन ठाणेदारांसह जिल्ह्यातील पाच ठाणेदारांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. वाळूमाफियांचा उच्छाद आणि अमित बटाऊवाले हत्याकांडाच्या पार्श्वभूमिवर तपासात अपयशी ठरलेल्या या ठाणेदारांची उचलबांगडी करण्यात आली. अचलपूरचे ठाणेदार चक्षुपाल बहादुरे यांना अमरावती ग्रामीण नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे. त्यांच्याजागी खोलापूर येथील ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सरमसपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार मडावी यांच्या जागी ठाणेदार मुकेश गावंडे यांची नेमणूक केली गेली आहे. ‘लोकमत’ने अमित बटाऊवाले हत्याकांड प्रकरण लावून धरले. त्यात ठाणेदारांची मवाळ भूमिकाही उघड केली. परिणामी ठाणेदारांची उचलबांगडी झाली आहे. रेती तस्करांवर पुरेशा प्रमाणात वचक ठेवण्यात न आल्याने अमित बटाऊवाले हत्याकांड घडले. रेती तस्करीवरून हे संपूर्ण प्रकरण घडले असताना त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी विलंब केला. परिणामी आरोपींना एकप्रकारे मुभाच मिळाली. या पार्श्वभूमिवर झालेल्या ठाणेदारांच्या बदल्या बऱ्याच बोलक्या आहेत. सिनेस्टाईल अटक की आत्मसमर्पण?अमित बटाऊवाले हत्याकांडातील दोन आरोपी नगरसेवक मो.शाकीर हुसैन व त्याचा भाऊ मो. आबिद हुसैन यांच्या अटकेबाबत जुळ्यानगरीत विविध विरोधाभासी चर्चा सुरू होत्या. पोलिसांनी आरोपींना सिनेस्टाईल अटक केल्याची चर्चा रंगली असतानाच उपरोक्त दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची चर्चाही ऐकू येत होती. पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही आरोपी विनासुरक्षा फिरत असल्याच्या व्हिडीओ क्लिप्स भ्रमणध्वनीवरून फिरत असल्याने आरोपींना नेमकी अटक कशी झाली, याबाबत चर्चांना ऊत आला होता. पोलीस निरीक्षकांच्या 'रुटिंन' बदल्या करण्यात आल्या आहेत. अचलपूर येथील ठाणेदारांची बदलीही त्याचा एक भाग आहे. त्या ठिकाणचे कार्य चांगले वाटले नाहीत म्हणून त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसे पॉवर एसपींकडे आहेत. - लखमी गौतम, जिल्हा पोलीस अधीक्षक, तपास अधिकाऱ्यांची ईदगाहकडे गस्त सुरू असताना माहिती मिळाली की, आरोपी मो. शाकीर व आबीद हुसैन निजामपूर रस्त्याने रणबाबाकडे जात आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. - बी.डी.पौनीकर, उपविभागीय पोलीस अधिकारीअमित बटाऊवाले हत्याकांडातील दोन आरोपी मो. शाकीर व आबिद हुसैन हे निजामपूर रस्त्याने दुचाकीने जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना सिनेस्टाईल अटक केली. त्यांनी पोेलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना पकडण्यात यश आले. - अजय आखरे, पीएसआय (तपास अधिकारी)