सहकारला एक जागा : बच्चू कडू, अजय पाटलांचे यशपरतवाडा : अचलपूर शेतकी खरेदी विक्री सोसायटी निवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर झाला. बच्चू कडू, सभापती अजय पाटील यांच्या नेतृत्वातील समता पॅनेलने १७ पैकी तब्बल १६ जागांवर घवघवीत विजय संपादन केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व विजय काळे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. मात्र प्रहारचे मोहन वानखडे यांचा पराभव झाला की पाडले? यावर राजकीय चर्चा रंगू लागली आहे.१५ मे रोजी अचलपूर शेतकी खरेदी विक्री सोसायटीसाठी १६ जागेवर मतदान घेण्यात आले. सहकार पॅनेलतर्फे केवळ १६ जागांवर उमेदवार असल्याने समता पॅनेलचा एक उमेदवार अविरोध निवडून आला होता.सोमवारी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची गोदामात निवडक अविकारी एस.टि.केदार, विजय पांडे, आर.जी.गडलींग यांनी मतमोजणी केली. समता पॅनलने सर्वाधिक उमेदवार निवडून आले. त्यामध्ये सहकारी संस्था मतदार संघातून रमेश मडघे (२६ मते), धर्मदास सगणे (२७ मते), प्रभूदास ठाकरे (२८ मते), मंगेश हुड (२९ मते), राजेश भुयार (२७ मते), रामेश्वर लहाणे (२८ मते), गजानन बानाईत (२९ मते) तर सहकार पॅनेलच्या वर्षा आवारे (२९ मते) या एकमेव विजयी ठरल्यात. वैयक्तिक भागधारक मतदार संघातून मुकुंद उभाड (९४७ मते), प्रकाश प्रविणकार (९०७ मते), प्रमोद लांडे (८७७ मते), अरविंद हरणे (८८६ मते), अनसूचित जाती, जमाती मतदार संघ अशोक मालखेडे (१०१० मते), महिला मतदार संघातून सीमा ढेपे (९०८ मते), उज्ज्वला बोंडे (८९५ मते), इतर मागासवर्गीय मतदारसंघातून सतीश भुटारे (१०१६ मते) आणि भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून अनिल पवार (१०२६ मते) विजयी झाले. (प्रतिनिधी)
अचलपूर खविसंवर समताचे वर्चस्व
By admin | Updated: May 17, 2016 00:07 IST