अचलपूर : तहसील कार्यालयांतर्गत तहसील आपल्या दारी कार्यक्रम गावागावांत राबविण्यातयेत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ५० दिवसात एकूण ३२ गावात शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविण्यात आला असून सर्व विभागाची एकूण १४२२ कामे ऑन दी स्पॉट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, नवीन रेशन कार्ड, वेगळे रेशन कार्ड, तसेच तलाठीमार्फत विविध दाखले उत्पन्नाचा सातबारा याचा समावेश आहे. कोरोनाकाळात अचलपूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्याअनुषंगाने तहसील कार्यालयात प्राप्त अर्जांचा निपटारा करणे पूर्ण कालावधीत शक्य झाले नाही. त्यामुळे तहसील कार्यालयात प्रत्येक गावात नागरिकांची शेतकऱ्यांची विद्यार्थ्यांची निराधार वृद्ध तसेच ई-पीक पाहणी शेतीविषयक तक्रारीचा निपटारा करण्यात आला. यझ्ध्ये देवगाव कविठा बु., खरपी, येसुरणा, अंबाडा, खंडारे नायगाव, बोरगाव पेठ, भूगाव, रामपूर, बेलज, खोजपूर, खेलदेवमाळी, रासेगाव, येवता, बोर्डी, बोपापूर, वासनी, बु, पथरोट, वाघडोह, वडनेर भूजंग, शिंदी बु., परसापूर, वडगाव फत्तेपूर, भिलोना, हरम, उपातखेडा, सावळी दातुरा, निमदरी, दरियाबाद, धामणगाव, मल्हारा, सालेपूर, बेलखेडा या गावात हा कार्यक्रम राबविण्यात आला. यात २६९ संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे नवीन प्रकरणे, पुरवठा विभागातर्फे नवीन कार्ड, दुय्यम गाड्यामची ४८८ तसेच तलाठी यांच्यामार्फत ३७४ विविध दाखल्यांचे ऑन दी स्पॉट वितरण करण्यात आले. याकरिता तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनात नोडल अधिकारी नायब तहसीलदार मंगेश सोळंके, पुरवठा विभागाचे शैलेश देशमुख, सत्यपाल आठवले, उमेश पारधी कोठार यांनी परिश्रम घेतले.
कोट
तालुक्यातील ३२ गावात ५० दिवसात शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांची अनेक कामे ऑन दी स्पॉट करण्यात आली. प्रत्येक गावात जाऊन हजारो नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यात आल्यात.
- मदन जाधव, तहसीलदार, अचलपूर
140921\img-20210908-wa0255.jpg
अचलपुरात शासन आपल्या दारी