शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या शिकार प्रकरणातील आरोपींना जामीन नामंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 21:26 IST

आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

धामणगाव रेल्वे (अमरावती) : चांदूर रेल्वे प्रादेशिक परिक्षेत्रातील दत्तापूर नियतक्षेत्रात मौजा तळेगाव दशासर येथील शेताच्या धुऱ्याला विद्युत प्रवाह लावून बिबट्याची शिकार केल्याच्या प्रकरणातील आरोपींना जामीन नामंजूर करण्यात आला. प्रभाकर शिंदे (रा. तळेगाव दशासर), विजय नागोसे व रवींद्र थूल (दोन्ही रा. कोठा अलिपूर, ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींना १६ फेब्रुवारी रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी आ.अ. कोकाटे यांनी धामणगाव रेल्वे येथील प्रथम श्रेणी न्यायालयासमक्ष उपस्थित केले.

न्यायालयाने आरोपींना १८ फेब्रुवारीपर्यंत वनकोठडीत पाठविले होते. त्यांना १८ रोजी पुन्हा उपस्थित केले असता, न्यायालयाने आरोपींचा जामीन नामंजूर केला तसेच न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सदर प्रकरणात वनविभागातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सतीश घोडे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.

बिबट्याचे अवयव जप्तप्रभाकर शिंदे याने घटनास्थळ दाखविण्याची कबुली १७ फेब्रुवारी रोजी दिली. त्यावरून सहायक वनसंरक्षक लीना आदे, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर हे लोखंडे महाराज देवस्थानाच्या मौजा कोठा अलिपूर येथील शेतात पोहोचले. ज्या ठिकाणी बिबट जमिनीत गाडण्यात व जाळण्यात आला, त्या ठिकाणावरून शिकार केलेल्या बिबटचे केस, न जाळलेली हाडे १० नग, जाळलेली हाडे अंदाजे ५०० ग्रॅम, चामड्यासह केसाचे पुंजके, जळालेली दाताचे तुकडे १३ नग, न जळालेले नख, बांबूची काठी, लोखंडी तार, इलेक्ट्रिक वायर जप्त आदी साहित्य जप्त केले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय